महद्भाग्य हातासे आलें । परी भोगूं नाहीं जाणितलें । तैसे वैराग्य उत्पन्न जालें । परी विवेक नाहीं ॥ १ ॥
एखाद्या माणसास मोठें वैभव लाभले, पण त्यास त्याचा भोग कसा घ्यावा हें माहीत नसेल तर तें वाया जातें. त्याचप्रमाणें एखाद्याला वैराग्य प्राप्त झालें पण त्याच्या अंगीं विवेक नसेल तर त्या वैराग्यांतून आत्मज्ञान निर्माण होणार नाहीं.
You may have become very fortunate but if you do not know how to enjoy this then, that good fortune will be lost. It is like this, when renunciation/vairagya arises, but there is no vivek.