विवेकवैराग्य — समास 7: विषयत्यागनिरुपण

Fully populated

Vishayatyaga Nirupan (A Discourse on the Abandonment of Sense Objects)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

न्यायें निष्ठुर बोलणें । बहुतांस वाटे कंटाळवाणें । मळमळ करितां जेवणें । विहित नव्हे ॥ १ ॥

मराठी अर्थ

अगदी तर्कशुद्ध असलेले स्पष्ट बोलणें लोकांना आवडत नाहीं. पण ज्याप्रमाणें पोटांत मळमळत असरांना जेऊ नये, त्याप्रमाणें मनांत शंका असतांना श्रवण करणें बरें नव्हें.

English meaning

This `all' gets fatigued when its `speech' is the harsh chatter of the `many' people. How can you possibly enjoy the fruits of your pass actions when you suffer from such mental disquiet? (This knowing and this `speech' are truly the enjoyment of pass actions; `here' you let what has to come, come and you let what has to go, go, without any rejection or clinging. But the mind wants to take out something specific from this passing ever- flowing knowledge)

2
मूळ

बहुतीं विषय निंदिले । आणि तेचि सेवित गेले । विषयत्यागें देह चाले । हें तों घडेना ॥ २ ॥

मराठी अर्थ

पुष्कळ लोक विषयाची किंवा देहसुखाची निंदा करितात. पण स्वतः मात्र त्याचे सेवन करत जगतात. खरें म्हणजे विषयाचा त्याग केला तर देह चालणार नाहीं.

English meaning

When the sense objects are prohibited from this `all' then, there is the experiencing of this `thing'. But even if these sense objects are abandoned and there is the functi- oning of this body within knowledge still, that thoughtless paramatma has not been accomplished (ie. now the body is not perceived as some individual entity within this world and so, the senses are no longer perceived as separate functioning organs within that entity. Now no particular sound needs to be heard or no particular taste needs to be tasted etc. and everything is an integral part of this one moving knowledge. Still that Reality needs to be realized, otherwise one will once again fall back to body consciousness).

3
मूळ

बोलणें येक चालणें येक । त्याचें नांव हीन विवेक । येणें करितां सकळ लोक । हांसों लागती ॥ ३ ॥

मराठी अर्थ

बोलण्याचालण्याचा मेळ नसतो त्याला हीनविवेक म्हणतात. अशा हीन विवेकी माणसाला सगळें लोक हसतात.

English meaning

This `speech' is the action of that One but, this is the vivek of `I am' and it is inferior to that thoughtless understanding. Thoughtlessness laughs at this action of the `all' (though the atma is nirgun, it has accepted this sagun understanding as its Self).

4
मूळ

विषयत्यागेंविण तों कांहीं । परलोक तो प्राप्त नाहीं । ऐसें बोलणें ठाईं ठाईं । बरें पाहा ॥ ४ ॥

मराठी अर्थ

विषयाचा त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाहीं. असें सगळीकडे सांगितलेले आढळतें.

English meaning

But without letting go of these sense objects, one does not attain this `thing' of the world beyond (ie. nothing is required to be done because in truth, the `many' things are concepts we have created; the object, its enjoyment ie. good, not good etc. and the one who enjoys are all just thoughts. Therefore simply letting go of these is the only sadhana. Knowing is always there. It is just that at present, it is mixed with ignorance and this has brought objectification and `many' thoughts. Therefore as soon as thinking stops, knowing will shine unobstructed). And then, when this `speech' is everywhere, understand, I do not exist.

5
मूळ

प्रपंची खाती जेविती । परमार्थी काये उपवास करिती । उभयता सारिखे दिसती । विषयाविषयीं ॥ ५ ॥

मराठी अर्थ

पण प्रश्र्न असा कीं प्रपंच करणारे तेवढे खातात पितात आणि परमार्थ करणारे काय उपाशी राहतात ? विषय सेवनाच्या बाबतींत दोघेही सारखेंच दिसतात.

English meaning

"Is it the case that the one in prapanch dines and enjoys the fruits of his past actions and the one in paramarth fasts and does not enjoy these? Yet they both appear to enjoy the sense objects."

6
मूळ

देह चालतां विषय त्यागी । ऐसा कोण आहे जगीं । याचा निर्वाह मजलागीं । देवें निरोपावा ॥ ६ ॥

मराठी अर्थ

मनुष्य जिवंत असेंपर्यंत विषय सुटणें अशक्य आहे. देह जिवंत आहे पण विषय सोडून दिला आहे असा कोणी या जगांत आहे का ? या प्रश्र्नाचे उत्तर गुरुदेवांनी आम्हाला द्यावें.

English meaning

"And how can the body continue to function in this world if you abandon these sense objects? Master, explain to me the workings of this `speech'."

7
मूळ

विषय अवघा त्यागावा । तरीच परमार्थ करावा । ऐसें पाहातां गोवा । दिसतो किं ॥ ७ ॥

मराठी अर्थ

विषयाचा संपूर्ण त्याग केला तरच परमार्थ करतां येतो, असें म्हटलें तर फारच गोंधळ होतो.

English meaning

"And you have said that, when one abandons all the sense objects, then only is one performing paramarth. You understand this but, I am confused."

8
मूळ

ऐसा श्रोता अनुवादला । वक्ता उत्तर देता जाला । सावध होऊन मन घाला । येतद्विषईं ॥ ८ ॥

मराठी अर्थ

श्रोत्यानें आपली शंका सविस्तर मांडली. वक्त्यानें तिचे निरसन केलें. वक्त्याचें म्हणणे श्रोत्यांनी एकाग्र मनानें व त्या विषयांत लक्ष घालून ऐकावें.

English meaning

Such was the question by the listener and so the speaker gave this reply. Therefore be alert and concentrate the mind with regards to this.

9
मूळ

वैराग्यें करावा त्याग । तरीच परमार्थयोग । प्रपंचत्यागें सर्व सांग । परमार्थ घडे ॥ ९ ॥

मराठी अर्थ

वैराग्याच्या पार्श्वभूमीवर विषयांचा त्याग केला तरच परमार्थ साधण्याचा योग येतो. प्रपंचाचा त्याग केल्यानेंच सर्वांगीण परमार्थ घडतो.

English meaning

Only when these sense objects are given up through vairagya can there be that union with paramarth.6 (Real renunciation is renunciation of the thought of the object. When 6siddharameashwar maharaj By taking this world as true you carry out all worldly activities. But you should feel this is unreal. That, which has become unreal, is the real swarupa and it should be understood. When the world is made false in your inner heart, then the "thoughtless" will appear . . . But, living in this one understands that the object does not exist separate from everything else, unless the mind brings the thought of the object then, the thought can be abandoned) For only when there is the giving up of prapanch, can this `all' perfectly perform paramarth (the abandoning of the thought of the sense objects means this `all' is accomplished; but still perfect paramarth ie. thoughtlessness, has to be accomplished).

10
मूळ

मागें ज्ञानी होऊन गेले । तेंहि बहुत कष्ट केले । तरी मग विख्यात जाले । भूमंडळीं ॥ १० ॥

मराठी अर्थ

पूर्वीं जें मोठमोठे ज्ञानी होऊन गेले त्यांनी परमार्थासाठीं पुष्कळ कष्ट सोसलें. त्यानंतर तें जगांत महान झाले.

English meaning

In the past, gnyanis came and went away. They toiled and suffered to achieve this `all' also. And afterwards, when understanding came, they pervaded the whole world.

11
मूळ

येर मत्सर करितांच गेलीं । अन्न अन्न म्हणतां मेलीं । कित्येक भ्रष्टलीं । पोटासाठीं ॥ ११ ॥

मराठी अर्थ

बाकींचे प्रापंचिक लोक आपापसांत मत्सर करीत राहीलें. कांहीं अन्नानदशा होऊन मरण पावलें. तर कांहीं पोटासाठीं भ्रष्ट झालें.

English meaning

The rest went away nursing only jealousies. "Food, food" was their constant longing. And to fill this belly, that One within the `many', wanders around bewildered and confused.

12
मूळ

वैराग्य मुळींहून नाहीं । ज्ञान प्रत्ययाचें नाहीं । सुचि आचार तोहि नाहीं । भजन कैंचे ॥ १२ ॥

मराठी अर्थ

ज्या लोकांना अंगचे खरें वैराग्य नाही. स्वतःच्या अनुभवाचे ज्ञान नाहीं. शुद्ध आचार नाहीं, भजनपूजन नाहीं,

English meaning

If vairagya has not arisen from your very root (ie. `I want nothing from this world for nothing is there, I don't even want to know anymore'), then this knowledge of brahman cannot be attained. How can there be His bhajan, when that purush does not possess this pure conduct of the `all'?

13
मूळ

ऐसे प्रकारीचे जन । आपणास म्हणती सज्जन । पाहों जाता अनुमान । अवघाच दिसे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

अशा प्रकारची माणसें सज्जन म्हणून मिरवून घेतात. पण खरें पाहिलें तर हा सज्जनपणा काल्पनिकअसतो. वास्तविक नसतो.

English meaning

But such are the ways of the people and they call themselves Saints/sajjana. If you go to them, you will find that there is only guesswork and conjecture and the seeing of many objects.

14
मूळ

जयास नाहीं अनुताप । हेंचि येक पूर्वपाप । क्षणक्ष्णा विक्षेप । पराधीकपणें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

आपलें आजपर्यंतचे आयुष्य वाया गेले असा अनुताप न होणें हें त्या माणसामचे एक महापापच समजावें. दुसर्‍याचा उत्कर्ष पाहून त्यांच्या मनांत विक्षेप उत्पन्न होतो. त्यांचा मत्सर जागा होतो.

English meaning

If this mula maya does not repent then, that thoughtless One is this original sin (ie. sankalp, `I am'). Then every moment there is this obstruction of the wealth that truly belongs to another (ie. there is One only and everything belongs to Him; but this `I am' does not want to give up its kingdom)

15
मूळ

मज नाहीं तुज साजेना । हें तों अवघें ठाउकें आहे जना । खात्यास नखातें देखों सकेना । ऐसें आहे ॥ १५ ॥

मराठी अर्थ

" जें मला नाहीं तें तुलाही शोभत नाहीं " हा मत्सराचा दृष्टीकोन सर्वांच्या परिचयाचा आहे. ज्याला खायला अन्न मिळत नाहीं तो अन्न खाणार्‍याला निर्मळ मनानें पाहूं शकत नाहीं, त्यातलाच हा प्रकार आहे.

English meaning

Then afterwards body consciousness comes and that thoughtless One says, "If I do not get happiness then, why should it come to you?" Therefore, if you do not destroy this world by leaving the sense objects then, you cannot perceive this `all'.

16
मूळ

भाग्यपुरुष थोर थोर । त्यास निंदिती डीवाडखोर । सावास देखतां चोर । चर्फडी जैसा ॥ १६ ॥

मराठी अर्थ

भाग्यवंत अशा निरनिराळ्या थोर पुरुषांची टवाळखोर निंदा करतात. सज्जन माणसाला पाहून चोर चरफडतात. तशांततलाच हा प्रकार आहे.

English meaning

That fortunate purush (who has vairagya and vivek) is the greatest of the great. But He gets criticized by those who want everything in abundance. But they are just like thieves, restless due to the wealth of his neighbours. (maharaj ask your mind, what do you not want? He will say "I want everything")

17
मूळ

वैराग्यापरतें नाहीं भाग्य । वैराग्य नाहीं तें अभाग्य । वैराग्य नस्तां योग्य । परमार्थ नव्हे ॥ १७ ॥

मराठी अर्थ

वैराग्यासारखें भाग्य नाहीं. वैराग्य नसेल तें दुर्भाग्य होय. कारण वैराग्याच्या अभावी योग्य रीतीनें परमार्थ होत नाहीं.

English meaning

There is nothing as fortunate as vairagya. And if there is no vairagya then, that Self is very unfortunate. In truth, there can be no proper paramarth where there is no vairagya (ie. through vivek there is the giving up of the thought of the object).

18
मूळ

प्रत्ययेज्ञानी वीतरागी । विवेकबळें सकळ त्यागी । तो जाणीजे माहांयोगी । ईश्र्वरी पुरुष ॥ १८ ॥

मराठी अर्थ

ज्याच्यापाशीं अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्यानें सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, असा पुरुष महायोगी समजावा. तो ईश्र्वरी पुरुष असतो.

English meaning

The gnyani who has gained knowledge of brahman is free from desire. He has abandoned this `all' through determined vivek. He should be known as a great yogi, for He is the purush within this prakruti.

19
मूळ

अष्टमा सिद्धीची उपेक्षा । करुन घेतली योगदीक्षा । घरोंघरीं मागे भिक्षा । माहादेव ॥ १९ ॥

मराठी अर्थ

श्रीशंकर हा वैराग्याचा परम आदर्श आहे. आठ मोठ्या सिद्धिंना बाजूस सारुन श्रीमाहादेवानें योगदिक्षा घेतली आणि तो घरोघर भिक्षा मागत फिरतो.

English meaning

Even mahadev/shiva set aside His eight occult powers and took yoga initiation and went begging door to door for alms.

20
मूळ

ईक्ष्वराची बराबरी । कैसा करील वेषधारी । म्हणोनिया सगट सरी । होत नाहीं ॥ २० ॥

मराठी अर्थ

महादेवासारखा वेष धारण करणारा त्याची बरोबरी करुं शकणार नाहीं. म्हणून बाहेरुन सारखेपणा दिसला तरी सर्वांची योग्यता सारखीं नसते.

English meaning

But how can a man who only dons the sannyasi's orange dress be the equal of that purush? Therefore, everything should not be all lumped together as all the same.

21
मूळ

उदास आणी विवेक । त्यास शोधिती सकळ लोक । जैसें लालची मूर्ख रंक । तें दैन्यवाणें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

जो अंतरी वैराग्यसंपन्न व विवेकी असतो अशा पुरुषाला पुष्कळ लोक शोघीत येतात. याच्या उलट जो लोभी, आसक्त व विचेकहीन असतो असा भाग्यहीन दिनवाणें जीवन जगत असतो.

English meaning

The one with dispassion and vivek searches through this world and finds this world of the `all'. And if they are said to be the same then, that Reality has become a foolish and greedy beggar, full of shameful chat.

22
मूळ

जे विचारापासून चेवले । जे आचारापासून भ्रष्टले । विवेक करुं विसरले । विषयलोभी ॥ २२ ॥

मराठी अर्थ

जी माणसें उच्च विचारांपासून खाली घसरलेली असतात, जी आचारनें भ्रष्ट असतात, ती माणसें विषयांच्या लोभानें आत्मानात्मविचार करुं शकत नाहींत. सारासार विचाराचा त्यांना विसर पडतो.

English meaning

Then mula maya has wandered from thoughtlessness. Then mula maya has let this proper behaviour slip away (ie. `He does everything'). Then vivek has been forgotten due to greed of the sense objects.

23
मूळ

भजन तरी आवडेना । पुरश्र्चर्ण कदापि घडेना । भल्यांस त्यांस पडेना । येतन्निमित्य ॥ २३ ॥

मराठी अर्थ

त्यांना भजनपूजन आवडत नाहीं. त्यांच्या हातून पुरश्र्चरण कधीं घडत नाहीं. याच कारणाने त्यांचे संत-सज्जनांशी जमत नाहीं.

English meaning

If this bhajan is made but not with fondness then, the guru's instructions have not been cherished. On account of this, that paramatma remains a jiva and will not be accepted as a virtuous purush.

24
मूळ

वैराग्यें करुन भ्रष्टेना । ज्ञान भजन सांडिना । वित्पन्न आणि वाद घेना । ऐसा थोडा ॥ २४ ॥

मराठी अर्थ

वैराग्यसंपन्न असून जो भ्रष्ट होत नाहीं, ज्ञानी असून जो भगवमताचे भजन सोडत नाहीं, स्वतः विद्वान असून जो कधीं वादांत पडत नाहीं, अशीं माणसें फार थोडी आढळतात.

English meaning

Rare is one who through vairagya has no confusion; who does not let slip this knowledge (ie. vivek) and bhajan; and who does not accept the learned scriptures, the rumours and debate.

25
मूळ

कष्ट करितां सेत पिके । उंच वस्त तत्काळ विके । जाणत्या लोकांच्या कौतुकें । उड्या पडती ॥ २५ ॥

मराठी अर्थ

कष्ट केलें तर शेतांत उत्तम पीक येते. भारी वस्तु असेल तर ती बाजारांत लगेच विकली जाते. त्याचप्रमाणें जो विवेक व वैराग्य या दोन्हीनीं संपन्न असतो, त्याच्याकडे जाणत्या लोकांच्या उड्या पडतात.

English meaning

Only after hard work will the field yield a good crop and at the market, these crops are highly valued. For the same reason, the Knower of this wonder (`all') of the world, eagerly endeavours to maintain His understanding.

26
मूळ

येर ते अवघेंचि मदले । दुराशेनें खोटे जाले । कानकोंडे ज्ञान केलें । भ्रष्टाकारें ॥ २६ ॥

मराठी अर्थ

हें ज्यांच्यापाशीं नसते तें लोक निस्तेजपणें मागें पडतात. मनांत आशा वागवल्यानें तें खोटे पडतात. वैराग्यभ्रष्ट झाल्यानें त्यांचे ज्ञान मिंधें बनते. तें कानकोडे होतें.

English meaning

The rest become dull and gross due to the `many' objects and they have `many' false hopes that are far from the atma and then this `dweller within delusion' pretends not to hear this knowledge (this knowledge `I am' is there but the jiva does not want to hear it).

27
मूळ

सबळ विषय त्यागणें । शुद्ध कार्याकारण घेणें । विषयत्यागाची लक्षणें । वोळखा ऐसीं ॥ २७ ॥

मराठी अर्थ

मर्यादा सोडून असणारे, प्रमाणाबाहेर जाणारे देहसुख सोडावें. शरीराचे धारण करण्यास जरुर तेवढेंच देहसुख सेवावें. विषयत्यागाची लक्षणें अशी आहेत हें ओळखून असावें.

English meaning

If these impure sense objects are abandoned then, this pure `cause and effect' is accepted (ie. let whatever is going to happen, happen; for He is doing). Recognize this attention by forgetting everything and that is the abandoning of the sense objects.

28
मूळ

सकळ कांहीं कर्ता देव । नाहीं प्रकृतीचा ठाव । विवेकाचा अभिप्राव । विवेकी जाणती ॥ २८ ॥

मराठी अर्थ

हें झालें वैराग्य आतां विवेक ऐकावा. जें जेम कांहीं घडतें त्याचा कर्ता ईश्र्वर आहे. प्रकृतिच्या पसार्‍याला खरें अस्तित्व नाहीं. असा निश्र्चय अंतर्यामी स्थिर होणें हा विवेक होय. जे खरे विवेकी असतात त्यानांच हा विवेकाचा अर्थ बरोबर कळतो.

English meaning

Then there is this `all thing' and God is the `doer'. But understand, He is not this place of prakruti (ie. He appears to be the same as this `all' of prakruti but He is the purush and quite separate and different). Only the viveki knows the importance of this vivek and then abandons this `all'.

29
मूळ

शूरत्वविषईं खडतर । त्यास मानिती लाहानथोर । कामगार आणि आंगचोर । येक कैसा ॥ २९ ॥

मराठी अर्थ

सर्व प्रसंगीं जो शौर्य दाखवतो त्याला लहान मोठे सर्वजण शूर मानतात. जो खरे कष्ट करणारा आहे तो आणि जो अंगचोर आहे तो, या दोघांची बरोबरी करतां येत नाहीं.

English meaning

That great brahman within this small jiva has respect for the viveki, for he is brave and determined within this tiresome and vile worldly existence. How can a sincere worker and a work-shirker be regarded as equal?

30
मूळ

त्यागात्याग तार्किक जाणे । बोलाऐसें चालों जाणे । पिंडब्रह्मांड सकळ जाणे । येथेयोग्य ॥ ३० ॥

मराठी अर्थ

कशाचा त्याग करावा व कशाचा करुं नये हें जो शुद्ध तर्कानें जाणतो, आपण जसें बोलतो तसें वागण्याचें जो जाणतो, पिंडब्रह्मांडाची रचना जो यथार्थपणें जाणतो,

English meaning

When one clearly understands this difference between abandoning the sense objects and not abandoning them, then one's conduct is the same as this `speech' and then one knows that the pinda and brahmanda are this `all'.

31
मूळ

ऐसा जो सर्व जाणता । उत्तमलक्षणी पुरुता । तयाचेनि सार्थकता । सहजचि होये ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

असें सर्व जाणणारा असून जो उत्तम गुणांनी पूर्ण संपन्न असतो त्याच्या संगतीनें आपल्या आयुष्याचें सार्थक घडतें.

English meaning

Such a purush is the Knower of this `all' and He is satisfied with that superior guna only. Due to that, the meaning of life is naturally understood. .