प्रकृतिपुरुष — समास 10: टोणपसिद्धालक्षण

Fully populated

Tonapa Siddha Lakshan (The Attributes of the Blockhead-Siddha)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

आवर्णोदकीं हटकेश्र्वर । त्यास घडे नमस्कार । महिमा अत्यंतचि थोर । तया पाताळलिंगाचा ॥ १ ॥

मराठी अर्थ

पृथ्वीच्याभोवतीं सात समुद्रांचे आवरण आहे. त्या आवरणोदकामध्यें हतकेश्र्वर नांवाचे शिवलिंग आहे. त्याला मी नमस्कार करतो. त्या पाताळलिंगाचा महिमा फार थोर आहे.

English meaning

Within these controlling waters (ie. great water element) that enclose the earth there is Lord ishwara (ie. Witness). To that purush we make our namaskar (We give our namaskar or bow down to that purush by placing our thoughts and concepts at His feet). Then the greatness of this Knower of the *lower world is to be offered to that Reality (When this gross world returns from where it came ie. out of this causal body of zero, then there is the Knower of this zero ie. Witness and witnessed. And when this witnessing is offered to that Reality then, this triad goes off. Reality has no other and no knowledge and no ignorance).

2
मूळ

परंतु तेथें जाववेना । शरीरें दर्शन घडेना । विवेकें आणावें अनुमाना । तया ईश्र्वरासी ॥ २ ॥

मराठी अर्थ

पण तेथें स्थूलदेहानें जाऊन प्रत्यक्ष दर्शन घेतां येत नाहीं. म्हणून त्या ईश्र्वराबद्दल विवेकानेंच कल्पना करावीं लागते.

English meaning

But `there' one cannot go with a body and get His darshan/`vision' (ie. one must leave off all eight bodies). Therefore through vivek your conjectures should be given to that purush and His conjecture ie. witnessing, should then be given to that Reality (maharaj- leave off every concept from the mind; that is being in your Self).

3
मूळ

सातां समुद्रांचे वेडे । उदंड भूमि पैलिकडे । सेवटीं तुटले कडे । भूमंडळाचे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

प्रथम सात सागरांचे वेढे आहेत. त्यांच्यापलीकडे विस्तीर्ण भूमी आहे. त्याच्याही पलीकडे भूमंडळाचे कडे तुटलेले आहेत.

English meaning

There are the seven seas surroundings the earth (ie. you have taken a gross form due to a concept; when you imagine "I am a man" then, you appear as a man) and that vast paramatma on the other shore. In the end when there is vivek, the borders of this earth get broken (by vivek, the objective ceases because the mind does not want to create concepts of names and individual forms and so the gross cannot remain)

4
मूळ

सात समुद्र वोलांडावे । तेथें जाणें कैसें फावे । म्हणोन विवेकी असावे । साधुजन ॥ ४ ॥

मराठी अर्थ

एवढें सात समुद्र ओलांडून जाणें कांहीं शक्य नाहीं.म्हणून साधु पुरुषांनीं विवेकानेंच त्याचे ज्ञान करुन घ्यावें.

English meaning

One should cross over these seven seas of objectivity by knowing. But still, how can this knowing attain `there' (for `there' is beyond knowledge)? Therefore the viveki should be the sadhu (first there should be atma/anatma vivek and then the thoughtless essence will be understood by the sadhu).

5
मूळ

जें आपणांस नव्हे ठावें । तें जाणतयास पुसावें । मनोवेगें तनें फिरावें । हें तों घडेना ॥ ५ ॥

मराठी अर्थ

जी गोष्ट आपल्याला माहित नाहीं, ती जाणत्याकडून समजून घ्यावी. मन ज्या वेगानें फिरुं शकतें त्या वेगानें शरीर कांहीं फिरुं शकत नाहीं.

English meaning

If mula maya does not know its own Self then, it should seek the advice of the Knower (ie. it should stay in the company of the Knower/atma purush; see 18.2). But if there is a speeding mind moving around with a body then, that thoughtless paramatma cannot be accomplished.

6
मूळ

जें चर्मदृष्टीस नव्हे ठावें । तें ज्ञाानदृष्टीनें पाहावें । ब्रह्मांड विवरोन राहावें । समाधानें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

जें डोळ्यांच्या दृष्टीला दिसत नाहीं, तें ज्ञानदृष्टीनें पाहावें. ज्ञानदृष्टीनें सार्‍या ब्रह्मांडाचे विवरण करावें. आणि समाधानानें राहावें.

English meaning

mula maya should not see with these physical eyes and it should understand through the `eyes' of knowledge (ie. forgetting is remembering). Then afterwards when this brahmanda has been fully investigated, one remains in samadhan (ie. nirgun under- standing). (By the `eyes' of knowledge the individual body is transcended and by thou- ghtlessness the universal body is given up)

7
Unverified — under review
मूळ

मध्यें आहे भूमीचे चडळ । म्हणौन आकाश आणी पाताळ । तें चडळ नस्तां अंतराळ । चहुंकडे ॥ ७ ॥

मराठी अर्थ

आपली ही पृथ्वी मध्येंच आहे. म्हणून वर आकाश व खालीं पाताळ असा भेद झाला. या पृथ्वीचा तुकडा जर मध्यें नसतां तर मग चोहोंकडे एकच रिकमें अंतराळ भरलेले दिसलें असतें.

English meaning

This earth lies in the middle, and so there is the sky above and the netherworld below. If this fragment of earth were not there in the middle, then on every side there would be only one continuous, empty space.

Note: John Norwell's English translation is truncated to a single stray letter ('v') for this owi, cut off right before a page break in the source PDF with no continuation afterward. The English above is a direct rendering of the sourced Marathi meaning rather than an independently cross-checked translation.

8
मूळ

तयास परब्रह्म म्हणावें । जें उपाधीवेगळें स्वभावें । जेथें दृश्यमायेच्या नांवें । सुन्याकार ॥ ८ ॥

मराठी अर्थ

जें स्वभावतःच उपाधीपासून मुक्त आहे आणि ज्याच्या ठिकाणी मिथ्या दृश्याचा मागमूस नाहीं. त्याला परब्रह्म असें नांव द्यावें. परब्रह्म अनंत आहे, अमर्याद आहे आणि दृश्यरहित आहे.

English meaning

And this space should be called parabrahman when that brahman is separated from its limiting concept of mula maya. Due to Its limiting concept there is this visible `all' of maya and then, That dwells in zero (ie. you say nothing is there, but you are there or not? Ignorance of your Self still remains).

9
मूळ

दृष्टीचें देखणें दृश्य । मनाचें देखणें भास । मनातील निराभास । विवेकें जाणावें ॥ ९ ॥

मराठी अर्थ

जें डोळ्यांना दिसतें तें दृश्य होय. जें मनाला आकलन होतें तो भास होय. मनाच्यापलीकडे असलेले जें निराभास परब्रह्म तें विवेकानें जाणावें.

English meaning

By searching, this `I am' is perceived; by searching, there is the appearance of this original mind (`I am' is the beginning of mind). Still, that which is beyond the mind and void of impression should be known through vivek.

10
मूळ

दृश्य भास अवघा विघडे । विवेक तेथें पवाडे । भूमंडळीं ज्ञाते थोडे । सूक्ष्मदृष्टीचे ॥ १० ॥

मराठी अर्थ

दृश्य पदार्थ आणि मनाचा भास हें दोन्ही जेथें मागे पडतात तेथें जो विवेकानें मजल मारतो, तो खरा ज्ञानदृष्टीनें पाहणारा होय. पण जगांत अशा सूक्ष्म दृष्टीचे ज्ञाते फार थोडे असतात. विज्ञान, तत्वज्ञान व आत्मज्ञान यांत ज्याच्या अंगी जितकी अधिक सूक्ष्म ज्ञानदृष्टी तितक्या प्रमाणांत तो मोठा द्रष्टा बनतो. ही सूक्ष्मव विशाल ज्ञानदृष्टी असणे तर परमार्थाची चित्कलाच होय.

English meaning

When the `many' things and this visible `all' are demolished then, vivek enters `there'. Few are the Knowers within this world with that subtle vision of brahman.

11
मूळ

वाच्यांश वाचेनें बोलावा । न बोलतां लक्ष्यांश जाणावा । निर्गुण अनुभवास आणावा । गुणाचेनयोगें ॥ ११ ॥

मराठी अर्थ

वाच्यंश वाचेनें बोलावा. पण लक्ष्यांश हा न बोलतां जाणावा. त्याचप्रमाणें गुणांच्या योगानें निर्गुणाचा अनुभव घ्यावा.

English meaning

The `word' meaning should be `spoken' through this divine `speech' and then the implied meaning can be known without `speaking' anything. That nirgun understanding should be brought to this sagun `experience' by staying in that pure sattwa guna.

12
मूळ

नाना गुणास आहे नाश । निर्गुण तें अविनाश । ढोबळ्याहून विशेष । सूक्ष्म देखणें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

गुणांचा नाश होतो हें प्रत्यक्ष दिसते. निर्गुण तें अविनाशी असते. ते अविनाशी निर्गुण सूक्ष्म असतें. म्हणून त्याला पाहाण्याची स्थूल, ढोबळ दृष्टी कामास येत नाहीं.

English meaning

When the gunas of the `many' are destroyed then, there is that indestructible nirgun. For from beyond the gross, this pure sattwa guna will behold that brahman (then you will meet Yourself).

13
मूळ

जें दृष्टीस न पडे ठावें । तें ऐकोन जाणावें । श्रवणमननें पडे ठावें । सकळ कांहीं ॥ १३ ॥

मराठी अर्थ

जें आपल्या स्थूल दृष्टीला दिसत नाहीं, त्याच्याबद्दल श्रवण करुन त्याचे ज्ञान करुन घ्यावें. श्रवण आणि मनन यांच्या सहायानें सर्व कांहीं आकलन करतां येते.

English meaning

When mula maya does not know its own Self then, it should listen and find out. Therefore first by shravan and manana, this `all thing' should be found.

14
मूळ

अष्टधेचे जिनस नाना । उदंड पाहातां कळेना । अवघें सगट पिटावेना । कोणीयेकें ॥ १४ ॥

मराठी अर्थ

पांच भूतें आणि तीन गुण यांच्यापासून अनेक प्रकारचे दृश्य पदार्थ निर्माण झालें. त्या सर्व पदार्थांचें ज्ञान करुन घेणें शक्य नाहीं. हें जरी खरें तरी सर्व पदार्थ कोणी सरसगट सारखेच मानू नयेत.

English meaning

When you see the `many' objects of this eightfold prakruti then, that vast paramatma has not been understood, for this whole lumped together world has not been driven away by that One within everyone.

15
मूळ

सगट सारिखी स्थिती जाली । तेथें परीक्षाच बुडाली । चविनटानें कालविलीं । नाना अन्नें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

जर सर्व पदार्थ सरसकट सारखेंच असतें तर तेथें चांगलें वाईट, विनाशी अविनाशी, उत्तम अधम इत्यादि भेद नसल्यानें परीक्षेला कांहीं वावच उरला नसता. समजा एखाद्या माणसाच्या तोंडला चव नाहीं तर तो सर्व अन्न एकेठिकाणी कालवतो. त्यामध्यें प्रत्येक पदर्थाची वेगळी चव उरतच नाहीं. तसा हा प्रकार होतो.

English meaning

If everything is lumped into one state then, there cannot be proper examination `there'. By mixing all together into one lump without discretion, the `many' thoughts cannot taste this food of `I am'.

16
मूळ

टोणपा नव्हे गुणग्राहिक । मूर्खास कळेना विवेक । विवेक आणी अविवेक । येकची म्हणती ॥ १६ ॥

मराठी अर्थ

ज्ञानदृष्टीहीन माणूस गुणग्रहण करुं शकत नाहीं. मूर्ख माणूस विवेक करुं शकत नाहीं. विवेक व अविवेक या दोन्हीला हे लोक एकच समजतात.

English meaning

The dull-minded do not appreciate this pure sattwa guna; for a fool does not know vivek. He says, vivek and avivek are the same thing only.

17
मूळ

उंच नीच कळेना ज्याला । तेथें अभ्यासचि बुडाला । नाना अभ्यासें प्राणीयाला । सुटिका कैंची ॥ १७ ॥

मराठी अर्थ

श्रेष्ठ कोणतें आणि कनिष्ठ कोणतें हे ज्याला कळत नाहीं, त्याला परमार्थाचा अभ्यास करतां येत नाहीं. सूक्ष्म व श्रेष्ठ, स्थूल व कनिष्ठ, हे कळले पाहिजे, तर परमार्थ साधना होऊं शकते. हें न कळतां स्थूलामधील नाना प्रकारचे अभ्यास केले तर माणसाला बंधनांतून मुक्त होतां येणार नाहीं.

English meaning

If that *highest and constant is not understood by that purush then, the study of `there' is drowned. And by the studies of the `many', the prana can never be set free. *(paramatma)

18
मूळ

वेड लागोन जालें वोंगळ । त्यास सारिखेंच वाटे सकळ । तें जाणावें बाश्कळ । विवेकी नव्हेती ॥ १८ ॥

मराठी अर्थ

ज्या माणसाला वेड लागले तो स्वतः तारतम्यहीन बनतो. घाण काय आणि चांगलें पदार्थ काय दोन्ही त्याला सारखेंच वाटतात. त्याचप्रमाणें स्थूल आणि सूक्ष्म; शाश्वत आणि अशाश्वत यांतील फरक ज्यांना कळत नाहीं तें ज्ञानहीन समजावे. ते कांहीं विवेकी नव्हेत.

English meaning

The one who is mad after the objects of the world is impure and he feels that this world of `many' things and this `all' are the same (when one thinks `I have understood'; but there is only some intellectual understanding; maharaj- you should feel, `oh, a change has come in me'). That One should be known as frivolous and unrestrained and not a viveki.

19
मूळ

ज्यास अखंड होतो नाश । त्यासीच म्हणती अविनाश । बहुचकीच्या लोकांस । काये म्हणावें ॥ १९ ॥

मराठी अर्थ

ज्या दृश्य वस्तूंचा सतत नाश चालू आहे त्यानांच हे लोक अविनाश म्हणतात. असल्या अडाणी पण स्वतःला शहाणे समजणार्‍या माणसांना काय म्हणावें?

English meaning

That unbroken brahman has fallen into ruin and that purush is a jiva and calls this world, the indestructible parabrahman. But what should one say to this talkative fool meddling in this world? (one should say nothing and just keep out of the mind)

20
मूळ

ईश्र्वरें नाना भेद केले । भेदें सकळ सृष्टी चाले । आंधळे परीक्षवंत मिळाले । तेथें परीक्षा कैंची ॥ २० ॥

मराठी अर्थ

ईश्र्वरानें पुष्कळ प्रकारचे भेद केलें आहेत. त्या भेदांच्या पार्श्वभूमीवर जग चालतें. हे प्रत्यक्षच आहे. पण परीक्षा करणारेच जर आंधळें असतील तर या दृश्य जगाची परीक्षा होणार कशी?

English meaning

Due to ishwara the `many' differences were made (due to the Witness, there was the known and due to this separation there appears the gunas sattwa, rajo and tamo and then the `many' things) and due to these differences, this `all' moves around in the gross world. And when blind examiners meet together, how can there be the examination of `there'? 9 (maharaj- birds of a feather, fly together)

21
मूळ

जेथें परीक्षेचा अभाव । तो टोणपा समुदाव । गुणचि नाहीं गौरव । येईल कैंचें ॥ २१ ॥

मराठी अर्थ

ज्या ठिकाणी परीक्षा करण्यास लागणारी ज्ञानदृष्टी नाहीं, तो टोणप्यांचा समूह असतो. त्यांच्या अंगी जरुर असणारे गुणच नसल्यानें परीक्षक म्हणून त्यांचा गौरव करता येत नाही.

English meaning

If `here' there is no proper examination of that nirgun then, that atma and this meeting place of the `all' have become a dull-minded jiva. Where that pure sattwa guna is not, how will there be honour and respect?

22
मूळ

खरें खोटें येकचि जालें । विवेकानें काये केलें । असार सांडून सार घेतलें । साधुजनीं ॥ २२ ॥

मराठी अर्थ

मानवी जीवनांत खरें व खोटें यांचें मिश्रण झालेलें असतें. मग विवेक काय करणार? तर विवेक करणारे साधुपुरुष त्यांतील असार सोडून सार तेवढें ग्रहण करतात.

English meaning

Where the true and false have become the same then, how can vivek be made? Only the sadhu leaves aside the non-essence and accepts the essence.

23
मूळ

उत्तम वस्तूची परीक्षा । कैसी घडे नतद्रष्टा । दीक्षाहीनापासीं दीक्षा । येईल कैंची ॥ २३ ॥

मराठी अर्थ

नतद्रष्ट म्हणजे हलक्या प्रतीच्या माणसाला उत्तम वस्तुची परीक्षा करता येत नाही. जो स्वतः दीक्षाहीन आहे त्याच्यापाशीं दीक्षेचे तेज व सामर्थ्य आढळणें शक्य नाही.

English meaning

How can a beggar examine that Supreme swarup? How can the non-initiated give initiation?

24
मूळ

आपलेन वोंगळपणें । दिशा करुन शौच्या नेणे । वेद शास्त्रें पुराणें । त्यास काये करिती ॥ २४ ॥

मराठी अर्थ

समजा एखादा माणूस शौच्यास गेला आणि ढुंगण न धुताच तसाच घणेरडा राहिला. तर वेद, शास्त्रें, पुराणें त्याच्यापुढें कांहींच करुं शकत नाहीत.

English meaning

When those who are filthy, conduct a purification rite at some place then, of what use is the reading of the veda, shasthras and puranas to them? (neti, neti has not been understood and there is only are repeated repetition of the scriptures)

25
मूळ

आधीं राखावा आचार । मग पाहावा विचार । आचारविचारें पैलपार । पाविजेतो ॥ २५ ॥

मराठी अर्थ

प्रथम आचार उत्तम रीतीनें पाळावा. त्याचप्रमाणें उत्तम विचार करायला शिकावें. अशा आचारविचारानें संपन्न माणसाला पैलतीरास जाता येते.

English meaning

Proper conduct (ie. `I do not do, He does everything') should be protected at the root 9Sadachar V.1368. If a group of men, blind from birth, are lead to an elephant and their hands are placed upon the elephant. Then when asked, "What is it?"; one will reply it is a winnowing fan (ie. an often used vedantic analogy; when a group of blind men are asked to identify an elephant; one touches the ears and says it's a winnowing fan; one touches the legs and says it is a tree trunk etc. Each man only knows apart of the elephant on account of his blindness.) 1369. In the same way (ie. due to our blindness), on account of `many' logical conclusions there are `many' examples and clever words; but how can `there' be established when the conclusions are all drawn from sensory perceptions? (Man, though being that thoughtless Reality, is born blind to that Reality and then he knows only with his senses and not with knowledge and cannot `see' properly. Then he mades that Reality into so many things which It is not). and then thoughtlessness should be understood. By proper conduct and thoughtlessness, that other side is reached.

26
मूळ

जें नेमकास न कळे । तें बाश्कळास केवी कळे । डोळस ठकती आंधळे । कोण्या कामाचे ॥ २६ ॥

मराठी अर्थ

परमार्थाचा नियमानें व व्यवस्थितपणें अभ्यास करणार्‍यांना सुद्धां परमार्थस्वरुप कळणें कठीण पडतें. तें अभ्यास न करणार्‍या टोणप्यांना कळणें शक्य नाहीं. ज्या ठिकाणीं डोळस माणसें फसतात. तेथें आंधळें फसतील यांत नवल नाहीं. आंधळ्याचें कांहीं चालणार नाहीं.

English meaning

If mula maya has not understood the Truth then, how can that Reality ever be known by the unrestrained and wild mind? Of what use is the blind where even those with good vision get deceived (maharaj- 99.9 percent of Saints have gone up to knowledge only).

27
मूळ

पापपुण्य स्वर्गनर्क । अवघेंच मानिलें येक । विवेक आणी अविवेक । काये मानावें ॥ २७ ॥

मराठी अर्थ

पापपुण्य, स्वर्गनर्क, हें सगळें जो एकच मानतो, तो विवेक आणि अविवेक यामद्ध्यें फरक मानणारच नाहीं.

English meaning

If sin and virtue, and heaven and hell are considered by the `many' as the same then, how can there be any distinction between vivek and avivek?

28
मूळ

अमृत विष येक म्हणती । परी विष घेतां प्राण जाती । कुकर्में होते फजिती । सत्कर्में कीर्ति वाढे ॥ २८ ॥

मराठी अर्थ

अमृत व वीष एक म्हटलें तर कांहीं हरकत नाहीं. पण वीष घेतलें तर प्राण जातो. त्याचप्रमाणें वाईट कर्में केल्यानें फजिती होतें आणि चांगलीं कर्में केल्यानें प्रसिद्धी होते. कीर्ति वाढते हा प्रत्यक्ष अनुभव आहे.

English meaning

They may say that nectar and poison are the same, but they will lose their life if they take poison (vivek needs to be understood; the objects of the world are a poison and this `I am' is the nectar). By bad deeds (be a body and drink the poison) there is disgrace and by this good deed one's pervasiveness increases (`I am everywhere').

29
मूळ

इहलोक आणि परलोक । जेथें नाहीं साकल्य विवेक । तेथें अवघेंच निरार्थक । सकळ कांहीं ॥ २९ ॥

मराठी अर्थ

इहलोक आणि परलोक, प्रपंच आणि परमार्थ, यांबद्दल सर्वांगीण विवेक ज्यांच्यापाशी नाहीं, त्यांच्या जीवनांत कशालाच कांहीं अर्थ राहात नाहीं. सगळेंच निरर्थक होऊन जाते.

English meaning

There is this world and the world beyond. If `here' there is not the `I am' of vivek then, `there' and this `all thing' are both made meaningless by the `many' thoughts.

30
मूळ

म्हणौन संतसंगेंचि जावें । सत्शास्त्रचि श्रवण करावें । उत्तम गुणास अभ्यासावें । नाना प्रयेत्नें ॥ ३० ॥

मराठी अर्थ

म्हणून सत्संगानें जावें. सत्शास्त्राचे श्रवण करावें. आणि नानाप्रकारें प्रयत्न करुन उत्तम गुणांचा अभ्यास करावा.

English meaning

Therefore one should go to satsang only (keep the company of the Truth). One should listen to the pure shasthras only (neti, neti). And that effortless superior guna should be practiced by the one who was making `many' efforts (ie. who was drowning in the three gunas). .