मराठी अर्थ
असा तो माणूस कसा तर- स्नान-संध्या नाही, भजन किंवा देव-पूजाही नाही. मंत्र, जप, ध्यान किंवा मानसपूजाही करत नाही. त्याच्याजवळ भक्ति किंवा प्रेमभावही नसतो. सद्बुद्धि नसल्याने चांगले गुणांचाही अभाव, भगवत् कथा, पुराण यांचे श्रवणही करत नाही. अध्यात्म निरुपणही कधिच ऐकत नाही. भल्या लोकांची संगत नसते. चित्तशुद्ध नसते. खोट्या दंभाने, मोक्षप्राप्ती कशी होणार ? त्याला नीति-न्यायाची चाड नसते. काही पुण्याचे काम करत नाही. परलोकाची प्राप्ती करुन घेण्याचा काही उपाय करत नाही. विद्या नसते तसेच त्याच्याजवळ वैभवही नसते. चातुर्य, कला, सरस्वतीचा वाग्विलास यापैकी काहींच नसते. शांती, क्षमा, दया, दीक्षा, मैत्री, शुभाशुभाचा विवेक-विचार नाही. कोठचेही साधन करत नाही. शुद्धता, स्वधर्माप्रमाणे वागणे नाही. योग्य आचार-विचार यांचा अभाव असतो. मनांत येईल त्याप्रमाणे स्वच्छंद वर्तणुक असते. कर्म, उपासना, ज्ञान, वैराग्य, योग किंवा धारिष्ट यापैकी काहींच नसते. असल्या वागण्याची उपरतिही नसते. त्याग नसतो. समता, परमेश्र्वराबद्दल आदर, प्रेम काहींच नसते. दुसर्याचे गुण पाहून आनंद होत नाही. परोपकार करत नाही त्यामुळे त्याचे सुख नाही. भगवंताच्या भक्तिचा लेशसुद्धा अंतर्यामी नसतो. अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंतअसून मेल्यासारखेंच असतात. त्या लोकांशी पवित्र लोकांनी बोलूसुद्धा नये. ज्याच्याजवळ पूर्वपुण्याई आहे त्यालाच भगवत्भक्ति घडते. जे जे जसे जसे कर्म करतात त्यांना तसे तसेच फळ मिळते.
English meaning
Then, there is no prayer (to know the sandhi or space between two thoughts) nor is there this sacred bath (in the ganga of knowledge). Then there is no bhajan (in every action to know your swarup) nor worship of God (worship shiva by becoming shiva). Then there is no mantra, japa, meditation, nor the offering of the mind. (These are all the proper duties of the brahmin)