मूर्खलक्षणनाम — समास 5: रजोगुणलक्षण

Fully populated

Rajogun Lakshan (The Characteristics of Raja Guna)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

मुळीं देह त्रिगुणाचा । सत्वरजतमाचा । त्यामध्यें सत्वाचा । उत्तमगुण ॥ १ ॥

मराठी अर्थ

आपला देह मुळांत सत्व, रज व तम या तीन गुणांचा बनला आहे, त्यांत सत्व गुण हा उत्तम आहे.

English meaning

The cause of the gross body is the three gunas of sattwa, raja and tama. And within this sattwa guna there is the superior guna (pure sattwa guna).

2
मूळ

सत्वगुणें भगवद्भक्ती । रजोगुणें पुनरावृत्ती । तमोगुणें अधोगती । पावती प्राणी ॥ २ ॥

मराठी अर्थ

सत्वगुणाने भगवंताची भक्ती होते. रजोगुण अंगी जास्त असेल तर पुनरपी जननं पुनरपी मरणं आणि तमोगुण अधिक असेल तर मनुष्यमात्रांची अधोगतीच होते.

English meaning

Due to this sattwa guna there is devotion to God. Due to raja guna there is rebirth and due to tamo guna ones state/condition within the prana deteriorates.

3
मूळ

त्यांतहि शुद्ध आणी सबळ । तेहि बोलिजेति सकळ । शुद्ध तेंचि जें निर्मळ । सबळ बाधक जाणावें ॥ ३ ॥

मराठी अर्थ

गुणांमध्ये शुद्ध व शबल असा भेद आहे. तो सगळा सांगणारच आहे. जे जे निर्मळ ते ते शुद्ध असते. जे जे मिश्रित असते ते ते शबल म्हणतात.

English meaning

Within these three gunas of the body there is the pure and impure. Therefore this `all' should be understood and when this `all' is purified then, it becomes that Reality, clear and free of any impediments. But when it becomes impure then, it should be known as an obstruction (ie. this `all' is the beginning of the gunas if you don't understand and it is the end of the gunas when you understand).

4
मूळ

शुद्धसबळाचें लक्षण । सावध परिसा विचक्षण । शुद्ध तो परमार्थी जाण । सबळ तो सांसारिक ॥ ४ ॥

मराठी अर्थ

शुद्ध व शबल यांची लक्षणे विचारवंतानी सावधपणें ऐकावित. शुद्ध हा परमार्थी तर शबळ हा संसारिक असतो.

English meaning

Listen carefully and be alert to the attentions of the pure and impure. Know that the one whose attention is pure is in paramarth and that the one whose attention is impure is in samsar.

5
मूळ

तया संसारिकांची स्थिती । देहीं त्रिगुण वर्तती । येक येतां दोनी जाती । निघोनियां ॥ ५ ॥

मराठी अर्थ

प्रापंचिक मनुष्याजवळ तीनही गुण असले तरी एक गुण प्रबळ झाला म्हणजे बाकी दोन मागे पडतात.

English meaning

When this condition of samsar comes to that Reality then, that One exists as the three gunas within the body and is a jiva. And when that One who is within this prakruti/purush is investigated and come upon then, these gunas cease to exist (and that One is nirgun, beyond the gunas).

6
मूळ

रज तम आणि सत्व । येणेंचि चाले जीवित्व । रजोगुणाचें कर्तुत्व । दाखऊं आतां ॥ ६ ॥

मराठी अर्थ

माणसाचे जीवन सत्व, रज व तम या तीन गुणांवरच चालते. आता आपण रजोगुणाचे काम मानवी जीवनांत कसें चालते, ते बघू.

English meaning

But if there is raja, tama and sattwa then, there is the living as a jiva. Now, it will be shown that the `many' actions of this raja guna take place within this `all' (ie. knowledge is the base of this world).

7
मूळ

रजोगुण येतां शरीरीं । वर्तणुक कैसी करी । सावध होऊनी चतुरीं । परिसावें ॥ ७ ॥

मराठी अर्थ

माणसाच्या शरीरांत रजोगुण प्रबल झाला की तो कसा वागतो, त्याची वर्तणुक कशी होते ? ते आता शहाण्यांनी लक्षपूर्वक ऐकावे.

English meaning

When the raja guna appears within this `all' body, how does it make one behave? Be alert and `listen' with wisdom.

8
मूळ

माझें घर माझा संसार । देव कैंचा आणिला थोर । ऐसा करी जो निर्धार । तो रजोगुण ॥ ८ ॥

मराठी अर्थ

हे घर माझे, हा संसार माझा मग येथे देव कोठून आला. असा ज्याचा विचार असतो, त्या ठिकाणी त्याच्याजवळ रजोगुण प्रबळ झालेला असतो.

English meaning

"This is my house and my family life. Why to bring God into this?" When that purush makes such assertions then, that One who requires no support becomes this raja guna. (We are, in truth, that purush but forgetting this, we take ourselves to be a body)

9
मूळ

माता पिता आणि कांता । पुत्र सुना आणि दुहिता । इतुकियांची वाहे चिंता । तो रजोगुण ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आपल्या कुटुंबांतील लोकांचीच म्हणजे आई, वडिल, पत्नी, मुल-मुली व सुना यांचीच जो काळजी घेतो तो रजोगुणी समजावा.

English meaning

Mother, father, wife, son, daughter and daughter-in-law. When this much only is cared for in the thinking mind/chitta then, that atma is raja guna.

10
मूळ

बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें । दुसर्‍याचें अभिळाषावें । तो रजोगुण ॥ १० ॥

मराठी अर्थ

आपण (व आपल्या कुटुंबांतील लोकांनी) चांगले खावे, चांगले प्यावे, चांगले अंगावर घ्यावे, चांगले नेसावे आणि दुसर्‍याच्या वस्तू आपल्याला कशा मिळतील असा विचार करावा तो रजोगुणी समजावा.

English meaning

That best (ie. atma) should live well; that best should enjoy the fruit of pass actions; that best should be beautifully decorated and that best should be well dressed. But when this `all' covets these things then, that atma purush is raja guna. (To know the atma is living well; then one can enjoy the fruit of past actions and one is beautifully dressed in this `all'; but when this `all' is forgotten then the atma takes the gross body as its own and the "I" claims these actions and qualities and says, "My body should live well and I should enjoy the fruits of past actions and I should look good and not come to any harm")

11
मूळ

कैंचा धर्म कैंचे दान । कैंचा जप कैंचे ध्यान । विचारीना पापपुण्य । तो रजोगुण ॥ ११ ॥

मराठी अर्थ

धर्म कसला व दान कसले ; जप व ध्यान कसले तसेच ज्याच्याजवळ पाप-पुण्याचाही विचार नाही, तो रजोगुणी ओळखावा.

English meaning

Then that One asks, "What is dharma and what is charity? What is japa and medi- tation?" When that pure understanding is not then, there is sin and virtue and that atma is raja guna.

12
मूळ

नेणे तीर्थ नेणे व्रत । नेणे अतीत अभ्यागत । अनाचारीं मनोगत । तो रजोगुण ॥ १२ ॥

मराठी अर्थ

तीर्थ यात्रा करणे नाही, व्रत करणे नाही. अतिथि किंवा अभ्यागताबद्दल आदर नाही. मनाची ओढ अनाचाराकडे, असा तो रजोगुण समजावा.

English meaning

When there is ignorance of the real place of pilgrimage and of how to observe your religious vows properly (the `all' is the real pilgrimage place and `I am He' should be your vow; but these are forgotten and there is only token worship); when one does not know how to welcome the uninvited guest (ie. by forgeting everything you welcome knowledge; it is always there and requires no invitation; it just has to be welcomed in) and when this inner intent/inspiration (`I am') dwells with these impure conducts then, that atma is raja guna.

13
मूळ

धनधान्याचें संचित । मन होये द्रव्यासक्त । अत्यंत कृपण जीवित्व । तो रजोगुण ॥ १३ ॥

मराठी अर्थ

धन-धान्याची सांठवणूक करणे, मन अत्यंत द्रव्यासक्त आणि अत्यंत कंजुषीचे वर्तन असा तो रजोगुणी ओळखावा.

English meaning

When money and grains are hoarded away and the mind is attached to the manifest names and forms (you who are the unmanifest atma); when one lives like a *miser then, that atma is raja guna. *(A miser hoards and has fear of losing his possessions)

14
मूळ

मी तरुण मी सुंदर । मी बलाढ्य मी चतुर । मी सकळांमध्यें थोर । म्हणे तो रजोगुण ॥ १४ ॥

मराठी अर्थ

मी तरुण, मी सुंदर, मी बलिष्ठ, मी चतुर, मी सगळ्यामध्ये थोर असे जो म्हणतो तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.

English meaning

When one says, "I am young, I am beautiful, I am strong, I am clever, I am the greatest of all" then, that atma is raja guna. (These are all adjectives for this `speech' of this `all' and the ego "I" misappropriates them)

15
मूळ

माझा देश माझा गांव । माझा वाडा माझा ठाव । ऐसी मनीं धरी हांव । तो रजोगुण ॥ १५ ॥

मराठी अर्थ

माझा देश, माझा गांव, माझा वाडा, माझे राहण्याचे ठिकाण ऐवढ्याचाच अभिमान याशिवाय बाकी कशालाच ओळखत नाही. तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.

English meaning

"My country, my village, my mansion, my place." When such attachments are kept in the mind then, that atma is raja guna.

16
मूळ

दुसर्‍याचें सर्व जावें । माझेंचि बरें असावें । ऐसें आठवे स्वभावें । तो रजोगुण ॥ १६ ॥

मराठी अर्थ

दुसर्‍याचे सर्व जावे माझे मात्र चांगलेच असावे. असा विचार जो करतो, तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.

English meaning

"Even if this `all' is lost, still I should have the best" (when this `all' has been lost then that best/atma cannot be acquired; still the ego says, "I want the best"). When this spontaneous `all'/knowledge starts to remember then, that atma is raja guna (maharaj- when you remember then you forget (your Self), when you forget then you remember your Self).

17
मूळ

कपट आणि मत्सर । उठे देहीं तिरस्कार । अथवा कामाचा विकार । तो रजोगुण ॥ १७ ॥

मराठी अर्थ

मनांत कपट, मत्सरी विचार देहामध्यें कामुकता आणि दुसर्‍याचा तिरस्कार किंवा त्याच्याबद्दल तुच्छतेची भावना ज्याचे अंगी तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.

English meaning

When there is jealousy and malice; when scorn or desire arises in the body; then that atma is raja guna.

18
मूळ

बाळकावरी ममता । प्रीतीनें आवडे कांता । लोभ वाटे समस्तां । तो रजोगुण ॥ १८ ॥

मराठी अर्थ

ज्याला मुलांबद्दल ममता असते, बायकोबद्दल प्रेम असते, सर्वांवर (कुटुंबियांवर) ज्याचा लोभ असतो. तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.

English meaning

When there is tremendous affection for a boy child and due to love, there is the atta- chment to one's wife; when greed arises for everything then, that atma is raja guna.

19
मूळ

जिवलगांची खंती । जेणे काळें वाटे चित्तीं । तेणें काळें सीघ्रगती । रजोगुण आला ॥ १९ ॥

मराठी अर्थ

आपल्या नातेवाईकांबद्दल काळजी वाटते व दुःख होते. तेव्हां रजोगुण त्याच्या ठिकाणी प्रबळ झालेला असतो, तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.

English meaning

When one is anxious about his nearest and dearest (though being oneself everywhere, one forgets that and becomes anxious for loved ones); when this mula maya worries about death then, that Reality moves on the path of death and it has become raja guna.

20
मूळ

संसाराचे बहुत कष्ट । कैसा होईल सेवट । मनास आठवे संकट । तो रजोगुण ॥ २० ॥

मराठी अर्थ

संसार करण्यांत, सांभाळण्यांत बरेच कष्ट आहेत. तो शेवटपर्यंत कसा निभावून नेऊ या विचारांनी मनांत चिंतारुपी संकट ओढवते. तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.

English meaning

When this `all' is troubled by samsar and asks, "How will this end?" When the mind remembers then, difficulties arise and that atma is raja guna.

21
मूळ

कां मागें जें जें भोगिलें । तें तें मनीं आठवलें । दुःख अत्यंत वाटलें । तो रजोगुण ॥ २१ ॥

मराठी अर्थ

आपल्या मागील काळांत जे चांगले सुखाचे भोग भोगले ते आठवून आता ते नाहीत म्हणून दुःख होऊ लागले की तो रजोगुणी म्हणुन ओळखावा.

English meaning

When mula maya enjoys something from the past (mula maya is the `now') then, that Reality is remembering itself in the mind. Then great sorrow arises and that atma is raja guna.

22
मूळ

वैभव देखोन दृष्टी । आवडी उपजली पोटीं । आशागुणें हिंपुटी । करी तो रजोगुण ॥ २२ ॥

मराठी अर्थ

वैभव बघितले आणि ते दुसर्‍याचे असले तरी आवडले आणि ते आपले व्हावे अशी इच्छा निर्माण झाली व ते मिळत नाही म्हणुन दुःखी होतो, तो रजोगुणी होय.

English meaning

The grandeur of this `all' was being perceived and then a liking is born in the mind (to see something specific, to see `many' objects and not just the one object of this `all'); due to this guna of *hope, despair is created (the world of dualities) and that atma is raja guna. *(raja guna forgets the `now' and dreams of something to be acquired in the future).

23
मूळ

जें जें दृष्टी पडिलें । तें तें मनें मागितलें । लभ्य नस्तां दुःख जालें । तो रजोगुण ॥ २३ ॥

मराठी अर्थ

जें दिसले तें तें आपले व्हावे असे मनांत वाटले. परंतु ते लभ्य होणार नाही, म्हणून दुःखी होतो तो रजोगुणी ओळखावा.

English meaning

When this vision of mula maya (`I am everywhere, always') tumbles downward into a body and that Reality begs from the mind and when it does not get what it wants and it feels sorrow then that atma has become this raja guna.

24
मूळ

विनोदार्थी भरे मन । श्रृंघारिक करी गायेन । राग रंग तान मान । तो रजोगुण ॥ २४ ॥

मराठी अर्थ

जो विनोदीवृत्तीने भरलेला असतो व ती व्यक्त करतो. जो शृगांरिक गाणी गातो. राग, रंग, ताना आणि हावभाव यांनी गायनां रंगून जातो. तो रजोगुणी समजावा.

English meaning

When the mind is full of regard for the pleasures of fame and fortune and so it sings the songs of the sensual; when the passions for the glitter and play bring longings and conceit then, that atma is raja guna.

25
मूळ

टवाळी ढवाळी निंदा । सांगणें घडे वेवादा । हास्य विनोद करी सर्वदा । तो रजोगुण ॥ २५ ॥

मराठी अर्थ

जो सदा दुसर्‍याची टवाळी, निंदा, चेष्टा करतो. बोलण्याने वादंग व वादविवाद निर्माण करतो. नेहमी हास्यविनोदांत मग्न असतो. तो रजोगुणी असतो.

English meaning

When there is ridicule, meddling and slander; when to that thoughtless understanding there appears discussion and argument; when one laughs at and makes fun of that Eternal then, that atma is raja guna.

26
मूळ

आळस उठे प्रबळ । कर्मणुकेचा नाना खेळ । कां उपभोगाचे गोंधळ । तो रजोगुण ॥ २६ ॥

मराठी अर्थ

जो अतिशय आळशी असतो. नाना करमणुकीच्या खेळांत दंग असतो. व्यसनाधीनतेने गोंधळ घालतो. तो रजोगुणी समजावा.

English meaning

When *laziness powerfully arises and there are the `many' plays and activities; when there is the bewilderment of enjoyments then, that atma is raja guna. *(In vedanta, laziness means to be involved in many worldly activities and not do that which one should do ie. forget everything and remember the Self)

27
मूळ

कळावंत बहुरुपी । नटावलोकी साक्षपी । नाना खेळी दान अर्पी । तो रजोगुण ॥ २७ ॥

मराठी अर्थ

जो कलावंत असतो. निरनिराळी सोंगे वठवितो. नाटके करणे व पाहाणे याचा शौकीन असतो. नाना प्रकारच्या जुगारांत पैसा घालवितो. तो रजोगुणी समजावा.

English meaning

When there is the skill and artistry in the ways of the `many'; when one is very intent and determined within this worldly drama; when in this play of the `many' that One gives away its own wealth and property then that atma is raja guna.

28
मूळ

उन्मत्त द्रव्यावरी अति प्रीती । ग्रामज्य आठवे चित्तीं । आवडे नीचाची संगती । तो रजोगुण ॥ २८ ॥

मराठी अर्थ

जोअमली पदार्थांचा व्यसनी असतो. गांवगुंडगीरीचे सारखे चिंतन आणि ज्याला नीच माणसांची संगत आवडते. तो रजोगुणी ओळखावा.

English meaning

When there is great love for the intoxication of the manifest (names and forms; ob- jectification); when in the chitta the sensual is remembered; when one is fond of the company of the lowly; then that atma is raja guna.

29
मूळ

तश्करविद्या जीवीं उठे । परन्यून बोलावें वाटे । नित्य नेमास मन विटे । तो रजोगुण ॥ २९ ॥

मराठी अर्थ

चौरविद्या शिकावी असे वाटते. दुसर्‍याचे दोष, कमीपण उघड करावेसे वाटते. नित्य नेमाने कांही चांगले करण्याचा कंटाळा येतो. तो रजोगुणी म्हणुन समजावा.

English meaning

When this stolen knowledge arises in the jiva; when this `speech' is felt to be this inferior and strange talk of the `many'; when the mind is tired of the Eternal and already established then, that atma is raja guna.

30
मूळ

देवकारणीं लाजाळु । उदरालागीं कष्टाळु । प्रपंची जो स्नेहाळु । तो रजोगुण ॥ ३० ॥

मराठी अर्थ

देवादिकाचे काम करण्याचा कंटाळा असतो. परंतु पोटपूजेसाठी कष्ट करतो. संसारांत, प्रपंचात सदा गुंतलेला असतो, तो रजोगुणी जाणावा.

English meaning

When one is ashamed to take part in the celebration of God; and one strives tirelessly for selfish interest; when that witnessing purush has affection for this worldly life, then that atma is raja guna.

31
मूळ

गोडग्रासी आळकेपण । अत्यादरें पिंडपोषण । रजोगुणें उपोषण । केलें न वचे ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

गोड खाण्याची अतिआवड असते. शरिराचे पोषण मोठ्या प्रेमाने करतो. रजोगुणी असल्याने कोठचेही उपवास करु शकत नाही. असा तो रजोगुणी ओळखावा.

English meaning

When one is mad after the gulping down of the pleasures; when one is very careful to nourish the individual body; when one cannot maintain a fast it is due to raja guna.

32
मूळ

श्रृंगारिक तें आवडे । भक्ति वैराग्य नावडे । कळालाघवी पवाडे । तो रजोगुण ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

स्वाभाविकपणें शृंगारिक विषयांची आवड/ओढा असतो. भक्ति, वैराग्य हे आवडत नाही. कलेचे/कलावंतांचे मोठ्या आवडीने कौतुक करतो, तो रजोगुणी असतो.

English meaning

When the sensual is liked and devotion and vairagya are not liked; when the `art of knowing' (when nothing is there, everything is known) is forcibly expanded into the `many' objects ("I want to see this and that") then, that atma is raja guna.

33
मूळ

नेणोनियां परमात्मा । सकळ पदार्थीं प्रेमा । बळात्कारें घाली जन्मा । तो रजोगुण ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

परमात्मा जाणत नाही. त्यावर प्रेम नसते. सर्व दृष्य वस्तुंवर मात्र प्रेम असते. परत जन्म नको वाटत असले तरी त्याच्याच बळजबरीने तो घ्यावा लागतो. तो रजोगुण ओळखावा.

English meaning

When one does not know that paramatma; when one's love is for the `many' within this `all'; when that One deliberately (by one's own wishes) takes a birth then, that is raja guna

34
मूळ

असो ऐसा रजोगुण । लोभें दावी जन्ममरण । प्रपंची तो सबळ जाण । दारुण दुःख भोगवी ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

तर रजोगुण हा असा आहे. मन आसक्तींत ठेवतो. परिणामी जन्ममरण भोगावयास लावतो. प्रपंचतांत बलवान असल्याने फार दुःख भोगावयास लावतो.

English meaning

So be it! Such is the nature of raja guna. Due to intense desire to have a body there is this appearance of birth and death. Know that then that atma becomes impure within this worldly existence and that One is made to suffer terribly.

35
मूळ

आतां रजोगुण हा सुटेना । सांसारिक हें तुटेना । प्रपंची गुंतली वासना । यास उपाय कोण ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

आतां हा रजोगुण कांही सुटत नाही. प्रपंचांतुन सुटका नाही. संसारसुखाचा मोह, वासना सुटत नाही. मग याला उपाय काय (जेणें करुन भगवंताच्या भक्तींत मन गुंतेल.)

English meaning

Now if this `I am' understanding does not cut this raja guna or that thoughtless Self does not break this worldly living then, this *vasana is entangled within this mundane existence and how can there be this remedy of `I am'? *(See 9.8.16 -vasana is the desire to exist; but due to this raja guna one takes oneself as a body and that vasana wants to exist as this gross body).

36
मूळ

उपाये येक भगवद्भक्ती । जरी ठाकेना विरक्ती । तरी येथानुशक्ती । भजन करावें ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

याला उपाय भगवत्भक्ती करणे. प्रपंचांतुन विरक्ती साधत नसेल तरीही आपल्या शक्तीनुसार भजन करावे.

English meaning

When there is this remedy of `I am' then, one has become a devotee of that One God. Still complete desirelessness (I do not exist) has not been reached and therefore, His bhajan should be made by means of this power of `I am'.

37
मूळ

काया वाचा आणि मनें । पत्रें पुष्पें फळें जीवनें । ईश्र्वरीं अर्पूनियां मनें । सार्थक करावें ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

काया, वाचा आणि मनाने ; पान, फुल, पाणी, फळें ही भगवंताला अर्पण करुन त्याची अर्चना, पूजा करावी. व सार्थक करावे.

English meaning

The mind should offer the body and speech of the jiva; in this way the leaves (the gross animate and inanimate objects), the flowers (experiences) and fruits (pleasures and pains) should be offered to Him. When these have been offered along with the mind, then there is the fulfillment of life's purpose.

38
मूळ

येथानुशक्ती दानपुण्य । परी भगवंतीं अनन्य । सुखदुःखें परी चिंतन । देवाचेंचि करावें ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

आपल्या शक्तीनुसार दान, धर्म, पुण्य करुन ते गाठीस जोडावे. भगवंताशी अनन्य बुद्धिने राहून सांसारिक सुख-दुःखांत त्याचेच चिंतन करावे.

English meaning

This power of `I am' is real charity (real charity is the donation of mind, body etc. to this `all') but in God there is no separateness/otherness. Otherwise this power of the `all' will bring the pleasures and pains of body consciousness where there should only be that thought of God.

39
मूळ

आदिअंती येक देव । मध्येंचि लाविली माव । म्हणोनियां पूर्ण भाव । भगवंती असावा ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

या विश्र्वाच्या आधी व नंतर तो एकच भगवंत आहे. मध्येच माया भुरळ पाडते. म्हणून भगवंतावर पू्र्ण भाव ठेवावा.

English meaning

From beginning to end, there is only that One God but in the middle avidya maya is felt ("I am a body"). Therefore this `I am' understanding of maya within God should be made complete (I do not exist).

40
मूळ

ऐसा सबळ रजोगुण । संक्षेपें केलें कथन । आतां शुद्ध तो तूं जाण । परमार्थिक ॥ ४० ॥

मराठी अर्थ

असा हा सबळ असलेला रजोगुण संक्षेपाने सांगितला. आता शुद्ध पारमार्थिक नेणारा तो रजोगुण जाणून घे.

English meaning

When there is this impure raja guna then, this `story' of knowledge only gets told in brief (a partial `story' gets told for then knowledge is mixed with ignorance). Therefore now, forget everything and know that you are that pure atma, the very nature of paramarth (Supreme Accomplishment).

41
मूळ

त्याचे वोळखीचें चिन्ह । सत्वगुणीं असे जाण । तो रजोगुण परिपूर्ण । भजनमूळ ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

त्या शुद्ध रजोगुणाला ओळखण्याची खुण म्हणजे ती सत्वगुणांत सापडते. तोच संपूर्ण भगद्भक्तीचे मूळ आहे.

English meaning

And when there is this known/prakruti of that atma (Knower) then, know that you are in the sattwa guna. Then that complete and perfect atma that had been this raja guna is the beginning of the sagun bhajan (ie. sattwa guna).

42
मूळ

ऐसा रजोगुण बोलिला । श्रोतीं मनें अनुमानिला । आतां पुढें परिसिला । पाहिजे तमोगुण ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

असा हा रजोगुण सांगितला. तो श्रोत्यांनी जाणून घेतला. आतां पुढे तमोगुण सांगितला पाहीजे.

English meaning

When the raja guna becomes this sattwa guna then, the conjectures of the mind are absorbed in this `speech' (when the conjectures of raja guna are not then, there is this `speech' of sattwa guna; it needs no invitation). Now, the tamo guna should also be carefully listened to and ahead it should become this sattwa guna. .