नवविधाभक्तिनाम — समास 8: सख्यभक्ति

Fully populated

Sakhya Bhakti (Devotion through Friendship with God)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

मागां जालें निरुपण । सातवें भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥ १ ॥

मराठी अर्थ

मागील समासांत सातव्या भक्तीचे वर्णन झाले. आतां आठवी भक्ति नीट लक्षपूर्वक ऐका.

English meaning

Previously this seventh devotion was discoursed. Now, listen with attention and there will be this eighth devotion.

2
मूळ

देवासी परम सख्य करावें । प्रेम प्रीतीनें बांधावें । आठवें भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २ ॥

मराठी अर्थ

देवाशी दृढ मैत्री करावी. प्रेम भावनेने देवाला जणु बांधुनच ठेवावे. हे आठव्या भक्तीचे लक्षण समजुन घ्यावे.

English meaning

There should be friendship with that Supreme God (atma purush); you should be bound to Him with great love. Such should be known as the eighth devotion.

3
मूळ

देवास जयाची अत्यंत प्रीती । आपण वर्तावें तेणें रीतीं । येणें करितां भगवंतीं । सख्य घडे नेमस्त ॥ ३ ॥

मराठी अर्थ

देवाला अतिशय आवडणार्‍या गोष्टी आपण कराव्यात. त्यामुळे भगवंताशी दाट मैत्री जडते.

English meaning

This `I am' of mula maya has great love for God and if you exist as this `I am' then, a close friendship with God will ensue. (That `I am' is not God but it is near to God; He remains hidden within this knowledge and He can never be known;8 He can only be directly experienced by being Him).

4
मूळ

भक्ति भाव आणी भजन । निरुपण आणी कथाकीर्तन । प्रेमळ भक्तांचें गायन । आवडे देवा ॥ ४ ॥

मराठी अर्थ

भक्ति, प्रेमाचा भाव, भजन, निरुपण, कथा-किर्तन, प्रेम भावनेने गाणार्‍या भक्तांचे गायन देवाला आवडते.

English meaning

God likes devotion, faith and bhajan; He likes this sagun discourse and the singing of kirtana (ie. to expand your pervasive); He likes the speaking of His `story' and this hymn, `I am He', that is sung by His loving devotees.

5
मूळ

आपण तैसेंचि वर्तावें । आपणासि तेंच आवडावें । मनासारिखें होतां स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥ ५ ॥

मराठी अर्थ

आपण त्याप्रमाणे वागावे. देवाला जे आवडते ते आपल्यालाही आवडावे. देवाच्या मनाप्रमाणे झाले की मैत्री जडते.

English meaning

When you exist in this way only, then that Reality has fondness for you. When your mind becomes like this `I am' then, naturally a firm friendship will develop (maharaj- mind is your best friend and your worst enemy).

6
मूळ

देवाच्या सख्यत्वाकारणें । आपलें सौख्य सोडून देणें । अनन्यभावें जीवें प्राणें । शरीर तेंहि वेंचावें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

देवाच्या मैत्रीसाठी आपण आपले देहसौख्य सोडून द्यावे. आपला जीव, प्राण व शरीर देवाला अर्पून मी देवासाठी आहे असा भाव ठेवावा.

English meaning

For the sake of God's friendship, you should let go of your happiness (do not seek happiness as a goal; happiness is a state of mind that comes and goes. maharaj- it's a sensation only). Due to the understanding of no-otherness (ie. there is One only; I do not exist), the jiva in the prana and even this `I am' body should not remain.

7
मूळ

सांडून आपली संसारवेथा । करित जावी देवाची चिंता । निरुपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्याचि सांगाव्या ॥ ७ ॥

मराठी अर्थ

आपल्या संसारांतील सुख-दुःख बाजूस ठेवून देवाच्या सुखाची कामाची काळजी घ्यावी. देवाच्या कथा, किर्तन, निरुपण व गोष्टी सांगाव्या.

English meaning

Leaving off the worries of samsar, you should care only for God. Still even this discourse of God's `story' (sagun) is a rumour and it should become that nirgun.

8
मूळ

देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी । सर्व अर्पावें सेवटीं । प्राण तोहि वेचावा ॥ ८ ॥

मराठी अर्थ

देवाच्या मैत्रीसाठी जीवलग मित्र व नातेवाईकांशी संबध तुटले तरी चालेल. सर्व देवाला अगदी प्राणसुद्धा अर्पावा.

English meaning

For the sake of God's friendship, there will be estrangement from your beloved resting place (ie. `all'). Because in the end when that nirgun understanding comes, this `all' will have to be given up along with the prana and that Witness also.

9
मूळ

आपुलें आवघें चि जावें । परी देवासीं सख्य राहावें । ऐसी प्रीती जिवें भावें । भगवंतीं लागावी ॥ ९ ॥

मराठी अर्थ

आपले सर्व गेले तरी चालेल पण भगवंताशी मैत्री तुटु देऊ नये. अशी मैत्री जीवाभावाने देवाशी व्हावी.

English meaning

Everything that you has claimed was yours, should *disappear but that intimate friendship with God should remain. You should love God with all your life. *(maharaj- you feel that you are losing everything, but what you are gaining is so great)

10
मूळ

देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासी न करावें निर्वाण । परम प्रीतीचें लक्षण । तें हें ऐसें असें ॥ १० ॥

मराठी अर्थ

देव म्हणजे जणुकांही आपला प्राणच समजाव. देव आपल्याला प्राणाहून प्रिय असावा. दृढ मैत्रीचे लक्षण असे असते.

English meaning

In the beginning, your prana should be called God and therefore your prana should not disappear (when the breath is there, everything is there; when the breath is not, nothing is there; maharaj- `when you awake, space is there. When space is there then, knowledge must be there. And then breathing comes': when you forget everything then your awareness expands and along with everything else there is the natural rising and falling of the breath). Pure love is when you give up your prana and then that thoughtless Reality meets Its own Self (pure love is, I do not exist).

11
मूळ

ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता । पांडव लाखाजोहरीं जळतां । विवरद्वारें काढिले ॥ ११ ॥

मराठी अर्थ

देवाशी अशी उत्कट मैत्री जोडली म्हणजे देवाला अशा भक्ताची काळजी लागते. पांडवांचा सख्य भाव एवढा उत्कट होता की लक्षाघरांत ते आगींत सापडले असतां भगवंताने त्यांना गुप्त गुहेंतून सुखरुप बाहेर काढले.

English meaning

When there is such supreme friendship then, the chitta/thinking process of the devotee meets God. The pandavas escaped from the burning house of wax through this tunnel. (The pandavas are the 5 elements, the house of wax is the body and the tunnel is the breath. The mind is thinking many thoughts in rapid sequence and each thought confirms the conviction "I am a body." Now if these thoughts are relinquished then your field of awareness will expand and in this process the mind will relinquish this elemental body and start to imagine that this whole elemental world is its home)

12
मूळ

देव सख्यत्वें राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासीं । आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

आपले जितके शुद्ध प्रेम, मैत्री असते, तशीच देवही आपल्याशी मैत्री ठेवतो. आपण जसे बोलतो तसेच प्रतिध्वनी आपल्याला ऐकावयास येतात. आपली श्रद्धा देवावर अनन्य भावाने असेल तर देवही आपली काळजी घेतो.

English meaning

When there is such friendship then, God remains with you always and that essence is near by (ie. God only exists, I do not). When you speak this divine `word' then, its echo will be just the same (then everywhere resounds with the sound `I am').

13
मूळ

आपण असतां अनन्यभावें । देव तत्काळचि पावे । आपण त्रास घेतां जीवें । देवहि त्रासे ॥ १३ ॥

मराठी अर्थ

आपला भाव जर अनन्य असेल तर व एका भगवंतावरच आपला विश्र्वास, श्रद्धा, निष्ठा असेल तर भगवंत आपल्याला तत्काळ प्रसन्न होतो. पण आपण त्याला कंटाळलो तर तोही आपल्याला कंटाळतो.

English meaning

And when you have the conviction of no-otherness then, at that time only, God is achieved. But if you accept the troubles of being a jiva, then God is also troubled.

14
मूळ

जैसें जयाचे भजन । तैसाचि देवहि आपण । म्हणौन हें आवघें जाण । आपणासि पासीं ॥ १४ ॥

मराठी अर्थ

ज्या भावनेने आपण भगवंताचे भजन करतो, त्याच भावनेने भगवंत आपल्यावर अनुग्रह करतो.

English meaning

And if your bhajan is this `I am' then, God will also be this. Therefore know that to be that thoughtless swarup or a mind full of so many thoughts, lies in your hands only.

15
मूळ

आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे । तरी गोष्टी आपणाकडे । सहजचि आली ॥ १५ ॥

मराठी अर्थ

एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही तर त्यामुळे भगवंतावरील आपले प्रेम, निष्ठा, श्रद्धा कमी होते. तसेच भगवंताचेही आपल्यावरील प्रेम, ममत्व कमी होते.

English meaning

When you don't appear as your mind then, that strong attraction for the mixed gunas and objectification is broken. Then this `I am story' that is in your possession naturally appears (ie. for you are the Knower and speaker of this `story').

16
मूळ

मेघ चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना । चंद्र वेळेसि उगवेना । तर्‍ही चकोर अनन्य ॥ १६ ॥

मराठी अर्थ

चातक मेघाचेच पाणी पितो. मेघाने वृष्टी केली नाही तर चातकाची तहान शमत नाही. पण तो मेघावरील प्रेम कमी करत नाही. तसाच चकोर चंद्राला उगवायला उशीर झाला तरी तो चकोर तसाच भुकेलेला उपाशी राहतो. पण चंद्रावरील प्रेम कमी करत नाही.

English meaning

If the cloud does not turn towards the chataka bird, still this bird will not go elsewhere for water. If the moon will not rise on time, still the chakor bird keeps undivided attention and will be waiting for the moon only.

17
मूळ

ऐसें असावें सख्यत्व । विवेकें धरावें सत्व । भगवंतावरी ममत्व । सांडूंचि नये ॥ १७ ॥

मराठी अर्थ

सख्य, मैत्री अशी असावी. भगवंताची मैत्री मोठ्या विवेकाने धरुन ठेवावी. त्याच्याशी असलेले सख्य, मैत्री, प्रेम कमी होऊन देऊ नये.

English meaning

Your friendship should be like this. Through vivek, this sattwa guna should be held firmly and in this way, your love for God should never be let slip.

18
मूळ

सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत । विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा ॥ १८ ॥

मराठी अर्थ

भगवंताला सखा मानावा. तोच माता, तोच पिता, तोच नातेवाईक व सगेसंबधीही तोच मानावा. तसेच विद्या, लक्ष्मी, धन व वित्तसुद्धा भगवंतच. आपले जे जे ते ते सर्व तो परमात्मा भगवंतच अशी भावना बाळगावी.

English meaning

You should regard God as your closest friend, your mother, father, relatives, lear- ning, wealth and money; then one should regard God as this `all' and finally that Supreme Self/paramatma (maharaj- everything you see and perceive is not, still He is there).

19
मूळ

देवावेगळें कोणी नाहीं । ऐसें बोलती सर्वहि । परंतु त्याची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९ ॥

मराठी अर्थ

आपल्याला देवाखेरीज कोणीच नाही. असे सर्वच म्हणतात. परंतु त्यांचा खरा भाव तसा नसतो.

English meaning

There is nothing other than God and it is He who is speaking this `I am'. But if you should take Him to be this `all' then, He is not there (when you feel `I am' then, God has become this `I am everywhere'; but in truth, He is One. Therefore this act of witnessing has to be dropped. How can there be witnessing where there is no-otherness?)

20
मूळ

म्हणौनि ऐसें न करावें । सख्य तरी खरेंचि करावें । अंतरी सदृढ धरावें । परमेश्र्वरासी ॥ २० ॥

मराठी अर्थ

म्हणुन असे खोटे वागु नये. देवाशी सख्य, मैत्री खरी भावना ठेवूनच करावे. मनांत देवाबद्दल प्रेम दृढ धरुन ठेवावे.

English meaning

Therefore one should not do like this and then that friendship will be true. *para- meshwara resides within this inner space of `I am' and He should be firmly established. *(ie. Supreme God or paramatma or parabrahman ie. beyond/para manifestation)

21
मूळ

आपुलिया मनोगताकारणें । देवावरी क्रोधास येणें । ऐसीं नव्हेत किं लक्षणें । सख्यभक्तीचीं ॥ २१ ॥

मराठी अर्थ

आपल्या मनासारखी एखादी गोष्ट झाली नाही तर देवावर रागावणे, नाराज होणे हे खर्‍या सख्य भक्तीचे लक्षण नव्हे.

English meaning

But if on account of your *`inner intent', anger arises then, God is covered over and then due to this attention, that friendship with God, is not. *(To be or to know; this feeling is the original separation and upon this there arises the feeling "I am a body" and desire, anger, fear etc.)

22
मूळ

देवाचें जें मनोगत। तेंचि आपुलें उचित । इच्छेसाठी भगवंत । अंतरुं नये कीं ॥ २२ ॥

मराठी अर्थ

भगवंताच्या इच्छेने जे घडून येईल तेच आपल्यासाठी योग्य आहे. आपली इच्छापूर्ती करण्यासाठी भगवंत अशा भावनेने भगवंतास दुरावी नये.

English meaning

When there is this `inner intent' of God then, this `inner intent' to be, becomes your reward. And on account of this wish to be, how can there not be an intervening space created between you and God?

23
मूळ

देवाचे इच्छेनें वर्तावें । देव करील तें मानावें । मग सहजचि स्वभावें । कृपाळु देव ॥ २३ ॥

मराठी अर्थ

देवाच्या इच्छीनेच आपले वर्तन असावे. देव करील ते स्वीकारावे. मग सहजच कृपाळु असलेला देव आपल्याला हवे ते देइल.

English meaning

Still one should live with this wish of God and then whatever God does, this should be *respected. Then naturally this spontaneous `all' will receive God's blessing. *(Let whatever has to come, come; let whatever has to go, go)

24
मूळ

पाहातां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायेसी । माता वधी बाळकासी । विपत्तिकाळीं ॥ २४ ॥

मराठी अर्थ

देवाची कृपा ही मातेच्या ममत्वापेक्षा मोठी असते. संकट ओढवले तर माता आपल्याच बाळाचा वध करते. देवाचे तसे नाही.

English meaning

If one understands this blessing of God then, what are the blessings of the mother (ie. maya)? The mother kills her child, in this time of misfortune (when one takes body consciousness).

25
मूळ

देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकिला । शरणागतांस देव जाला । वज्रपंजरु ॥ २५ ॥

मराठी अर्थ

शरण आलेल्याचा देव कधीच वध करत नाही उलट त्याचे रक्षणच करतो. त्याचा देवाने वध केला असे कधीच कोणी ऐकलेले नाही.

English meaning

Has God ever killed a devotee? This can never happen when one searches out and listens to this `I am'. God becomes the protecting armour of the devotee who has taken refuge at His feet (maharaj- if knowledge is there then death cannot come. First knowledge should go off then death can come). 9ie. desire, anger etc. qualities of space and mind

26
मूळ

देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी । देव होये साहाकारी । अनाथांचा ॥ २६ ॥

मराठी अर्थ

देव हा भक्तांवर कृपा करणारा आहे. देव पतितांचा उद्धार करणारा आहे. देव हा अनाथांचा सहाय्यकर्ता आहे.

English meaning

God is the protector of the devotee; God saves those who had fallen into this gross body; God becomes the companion of the orphan (one who does not know their true mother/mula maya and father/mula purush).

27
मूळ

देव अनाथांचा कैपक्षी । नाना संकटांपासून रक्षी । धाविन्नला अंतरसाक्षी । गजेंद्राकारणें ॥ २७ ॥

मराठी अर्थ

देव हा अनाथांचा पक्ष घेणारा आहे. तो त्यांना अनेक संकटांतून वाचवितो. गजेन्द्राला मगरीच्या तावडींतून सोडविण्यासाठी तो तत्काल धावला.

English meaning

God gives His support to that orphan and protects him from the `many' calamities. When gajendra, the elephant was caught by the crocodile (ie. ego), God Himself ran to save him; for God is also that Witness within this inner space (therefore understand this `all' and He will be ever present, watching over you).

28
मूळ

देव कृपेचा सागरु । देव करुणेचा जळधरु । देवासि भक्तांचा विसरु । पडणार नाहीं ॥ २८ ॥

मराठी अर्थ

देव हा कृपेचा सागर आहे. तो करुणारुपी मेघ आहे. देवाला भक्तांचा कधीच विसर पडत नाही.

English meaning

God is the ocean of grace; God is the cloud of compassion; God will never forget His devotee.

29
मूळ

देव प्रीती राखों जाणे । देवासी करावें साजणें । जिवलगें आवघी पिसुणें । कामा न येती ॥ २९ ॥

मराठी अर्थ

आपल्या भक्ताचे प्रेम कसे राखावें त्याला प्रेमांकित कसा करावा. व त्याचे प्रेम कसे वृधिंगत करावे. हे सर्व देवाला माहीत आहे. म्हणून देवाशी खर्‍या भावनेने सख्यत्व करा. आपले नातेवाईक हे स्वार्थ बुद्धिने जमा होतात. प्रसंगी आपल्या सहाय्यास येत नाहीत.

English meaning

God knows how to protect love. So, God should be made your beloved. He is your most beloved and He wipes away the desires within your mind.

30
मूळ

सख्य देवाचें तुटेना । प्रीती देवाची विटेना । देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३० ॥

मराठी अर्थ

देवाशी सख्य जोडले की ते तुटत नाही. देवाचे प्रेम कमी होत नाही. ते वाढतच जाते. देव शरणागताला कधी निराश करत नाही.

English meaning

God never breaks His friendship. God's love never wanes. God never turns away from those who have surrendered to Him.

31
मूळ

म्हणोनि सख्य देवासी करावें । हितगुज तयासी सांगावें । आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

म्हणून देवाशी सख्य, मैत्री खर्‍या भवनेने करावी. त्याल आपले सर्व सुख-दुःख सांगावे. आठव्या भक्तीचे हे असे लक्षण जाणून घ्यावे.

English meaning

Therefore your friendship should be with God only. And then this concealed `I am' 10His name was gajendra and he was the King of elephants and a great devotee of vishnu. should become that thoughtless, I do not exist. This `I am' should be known as this attention of the eighth devotion.

32
मूळ

जैसा देव तैसा गुरु । शास्त्रीं बोलिला हा विचारु । म्हणौन सख्यत्वाचा प्रकारु । सद्गुरुसीं असावा ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

जसा देव तसाच सद्गुरु असे शास्त्रांत सांगितले आहे. म्हणुन सख्यत्व सद्गुरुशी ही याचप्रकारे करावे.

English meaning

God and the guru are both the same. Within the shasthras (neti, neti) there is this speech `I am' and that understanding, I do not exist. Therefore this kind of friendship should be made with sadguru. .