मायोद्भव अथवा ज्ञानदशक — समास 6: दुश्चीतनिरुपण

Fully populated

Dushchit Nirupan (A Discourse on Inattentiveness)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

1
मूळ

श्रोता विनवी वक्तयासी । सत्संगाची महिमा कैसी । मोक्ष लाभे कितां दिवसीं । हें मज निरोपावें ॥ १ ॥

मराठी अर्थ

श्रोता वक्त्याला विनंती करतो कीं, आपण सत्संगाचा महिमा नेहमी सांगता. मग तो लाभला असतां किती दिवसांत मोक्ष मिळतो तें सांगावें.

English meaning

The listener asked the speaker. "What is the importance of keeping the company of the Truth/Saint? How many days will it take to gain Liberation now that thoughtles- sness has been explained to me."

2
मूळ

धरितां साधूची संगती । कितां दिवसां होते मुक्ती । हा निश्र्चय कृपामूर्ती । मज दिनास करावा ॥ २ ॥

मराठी अर्थ

सत्पुरुषाची संगत धरल्यावर किती दिवसांत ब्रह्मदर्शन घडून मुक्ती मिळते? कृपामूर्तींनी मज दिनास हें सांगावें.

English meaning

"When one keeps the company of the sadhu then, after how many days will Liberation come? Faith in that thoughtless Self (I do not exist) is your grace and this I humbly request of you."

3
मूळ

मुक्ती लाभे तत्क्षणीं । विश्र्वासतां निरुपणीं । दुश्र्चीतपणें हानी । होतसे ॥ ३ ॥

मराठी अर्थ

वक्ता म्हणतो कीं, सत्पुरुष जो उपदेश करतो त्यावर संपूर्ण विश्र्वास ठेवला तर ताबडतोप आत्मज्ञान होऊन मुक्ती लाभते. पण दुश्र्चितपणानें आपली फार हानी होते.

English meaning

Liberation is gained at that very moment when you are faithful to that nirgun discourse. But due to inattentiveness/*duschit this faith is lost. *(A mind that is far from the atma)

4
मूळ

सुचितपणें दुश्र्चीत । मन होतें अकस्मात । त्यास करावें निवांत । कोणे परीं ॥ ४ ॥

मराठी अर्थ

यावर श्रोता पुन्हा विचारतो कीं मन सुचित असतें पण एकाएकी तें दुश्र्चित होतें व अशांत होतें. ह्या अशांत मनाला शांत कसें करावें?

English meaning

"There was attentiveness and then the mind suddenly becomes inattentive (there was that understanding ie. attentiveness and then that was given up to thoughts and conjecture). How can I make this mind peaceful?"

5
मूळ

मनाच्या तोडून वोढी । श्रवणीं बैसावें आवडीं । सावधपणें घडीनें घडी । काळ सार्थक करावा ॥ ५ ॥

मराठी अर्थ

वक्ता सांगतो कीं, निरनिराळ्या वस्तूंकडे व विशयांकडे मन ओढलें जातें. तें प्रथम थांबवावे. नंतर खर्‍या आवडीनें श्रवण करावयास बसावें. वेळ वाया न जाऊं देण्याबद्दल सावध असावें. अशा रीतीनें आपला काळ सार्थकीं लावावा.

English meaning

The inclinations of the mind are to be cut and in shravan it should sit with fondness. By being alert from moment to moment there should be the real fulfilment of time.8

6
मूळ

अर्थप्रमेय ग्रंथांतरीं । शोधून घ्यावें अभ्यांतरीं । दुश्र्चीतपण आलें तरी । पुन्हां श्रवण करावें ॥ ६ ॥

मराठी अर्थ

आपण जो ग्रंथ श्रवण करतो, त्यामधील अर्थ व सिद्धांत समजून घ्यावें. मनाची एकाग्रता भंगून चित्त व्यग्र झाले तरी परत श्रवण करावें.

English meaning

The meaning implied within the scripture should be searched out and accepted within (ie. you are That). If inattentiveness comes then, again there should be shravan.

7
मूळ

अर्थांतर पाहिल्यावीण । उगेंचि करी जो श्रवण । तो श्रोता नव्हे पाषाण । मनुष्यवेषें ॥ ७ ॥

मराठी अर्थ

ग्रंथांमधील अर्थ बुद्धीमध्यें न साठवितां जो उगाच श्रवण करतो, तो खरा श्रोता नव्हें. मनुष्यरुपांत असलेला तो पाषाणच असतो.

English meaning

But if that purush makes shravan and afterwards becomes idle, then that inner meaning will not be understood. Then there is no listener and this stone is in the guise of a man.

8
मूळ

येथें श्रोते मानितील सीण । आम्हांस केलें पाषाण । तरी पाषाणाचें लक्षण । सावध ऐका ॥ ८ ॥

मराठी अर्थ

वक्ता आपल्याला पाषाण म्हणतो म्हणून श्रोत्यांना वाईट वाटेल. म्हणून पाषाणाचे लक्षण सांगतो. तें ऐकावें.

English meaning

If the listeners should feel unhappy because I have said that they are made of stone then, listen carefully and you will come to know the special quality of this stone.

9
मूळ

वांकुडा तिकडा फोडिला । पाषाण घडून नीट केला । दुसरें वेळेसी पाहिला । तरी तो तैसाचि असे ॥ ९ ॥

मराठी अर्थ

समजा, एखादा वाकडातिकडा दगड टाकीनें घडवून नीट केला. पुन्हा जर तो बघितला तर अगदी जसाच्या तसाच असतो.

English meaning

Whenever the crooked and distorted gets knocked off this stone and it gets properly formed then later, when seen again still this stone has not changed.

10
मूळ

टांकीनें खपली फोडिली । ते मागुती नाहीं जडली । मनुष्याची कुबुद्धि झाडिली । तरी तो पुन्हा लागे ॥ १० ॥

मराठी अर्थ

टाकीचे घाव घालून दगडाची खपली काढली की ती परत कांहीं दगडाला लावता येत नाही. परंतु माणसाचे मात्र अगदी विरुद्ध आहे. चांगल्या उपदेशानें माणसाची वाईट बुद्धि झाडली तर ती तेवढ्यापुरती बाजूला सरकते. परंतु पुन्हा ती त्याला चिकटते.

English meaning

A shard knocked off with the chisel does not join to the stone again.9 However if the bad intellect of a man is removed, it again comes back and establishes itself (ie. due to inattentiveness).

11
मूळ

सांगतां अवगुण गेला । पुन्हा मागुता जडला । याकारणें माहांभला । पाषाणगोटा ॥ ११ ॥

मराठी अर्थ

एखाद्या माणसाला त्याचा दोष, अवगुण समजावून दिला कीं, तो तेवढ्यापुरता सुटतो. पण पुन्हा तो त्याच्या अंतर्यामी येतोच. पाषाणाचे मात्र असें नाही. म्हणून माणसापेक्षां पाषाण बरा असें म्हणावें लागते.

English meaning

When you understand thoughtlessness (I do not exist) then, these wrong *gunas disappear, but again they return and stick to the intellect/buddhi. Still if this `speech' (ie. shravan) is maintained then, this block of stone can become most wise (ie. brahman). *(Mix of sattwa, raja and tama)

12
मूळ

ज्याचा अवगुण झडेना । तो पाषाणाहुन उणा । पाषाण आगळा जाणा । कोटिगुणें ॥ १२ ॥

मराठी अर्थ

पुष्कळ वेळां सांगून ज्याचा अवगुण सुटत नाही. तो माणूस पाषाणापेक्षां हीन दर्जाचा समजावा. अनेक पटीनें पाषाण बरा असें म्हणवें लागतें.

English meaning

But if that purush does not knock off these wrong gunas then, he is inferior to this *stone (and he remains in the guise of a man). This stone is vastly superior to any man when that most excellent pure sattwa guna is understood. *(In the yoga vasistha it says, knowledge is like a vast block of stone, that becomes whatever you choose to form of it)

13
मूळ

कोटिगुणें कैसा पाषाण । त्याचेंहि ऐका लक्षण । श्रोतीं करावें श्रवण । सावध होऊनी ॥ १३ ॥

मराठी अर्थ

अनेक पटीनें पाषाण बरा कसा त्याचें वर्णन करतो. श्रोत्यांनी मनःपूर्वक ते ऐकावे.

English meaning

And how does this stone, in the guise of a man, become that most excellent guna? First by listening there will be this `I am' and then afterwards, there will be the attention of that paramatma (I do not exist). Therefore in the listener there should be alert shravan.

14
मूळ

माणीक मोती प्रवाळ । पाचि वैडूर्य वज्रनीळ । गोमेदमणी परिस केवळ । पाषाण बोलिजे ॥ १४ ॥

मराठी अर्थ

माणिम, मोती, प्रवाळ, पांचू, वैडूर्य, वज्रनीळ, गोमेदमणी, परिस इत्यादि सगळे पाषाणच समजतात.

English meaning

By listening, the ruby, pearl and coral, the sapphire, turquoise, emerald and the topaz will be this paris stone (it turns iron to gold ie. this `I am') and afterwards this will become that pure knowledge. (When differences are seen in `many' precious stones then, the thoughts should be let slip and there should be the firm conviction of `I am'. Then no differences will be seen, for all is He. It is an inattentive mind ie. a mind that sees this world of `many' differences, that brings the different stones, colours, values etc.) (maharaj- a diamond and a hard piece of shit are the same to the gnyani) one the chippings of the four bodies, but these removed chips return and stick again. Because it goes on in this manner the "human-stone" does not become God easily.

15
मूळ

याहि वेगळे बहुत । सूर्यकांत सोमकांत । नाना मोहरे सप्रचित । औषधाकारणें ॥ १५ ॥

मराठी अर्थ

शिवाय सूर्यकांत, सोमकांत आणि रोगांवर औषध म्हणून लागू पडणारे मणी असे पाषाणाचे आणखी पुष्कळ प्रकार आहेत.

English meaning

This `speech' of `I am' is not like the suryakant/ jasper and somakant/ moonstone. The `many' mohara gems are believed to be an antidote for poison, but they do not give that pure experience that comes from this medicine of `I am'. (These stones that we consider as precious and even medicinal cannot be compared to this precious `I am'. This is the real remedy for the poison and sufferings of this world)

16
मूळ

याहि वेगळे पाषाण भले । नाना तीर्थीं जे लागले । वापी कूप सेखीं जाले । हरिहरमूर्ती ॥ १६ ॥

मराठी अर्थ

याहून आणखी वेगवेगळे पाषाण आहेत. तीर्थक्षेत्रीं मंदिरें, घाट, चबुत्रें, व धर्मशाळा बांधण्यास पाषाण वापरतात. विहिरी, आड वगैरेबांधण्यास दगड वापरतात. विष्णु, शंकर आदि देवांच्या मूर्तींसाठी उत्तम पाषाणच लागतात.

English meaning

And when this `I am' is passed over then, that stone is most wise indeed (ie. it becomes brahman). But first, this mula maya has to be established in the `many' different pilgrimage places and these wells and water tanks and reservoirs of water have to become this image of *hari-hara (siddharameshwar maharaj explained that the wells, water tanks etc. represented the individual minds, each being a container for consciousness. These have become dilapidated and now they should be repaired and any leaks should be shored up. Thus the `many' pilgrimage places should become this pilgrimage place of `I am' and the waters should be made pure once more, `Everywhere He is there'). *(Forgetting/hara is remembering/hari)

17
मूळ

याचा पाहातां विचार । पाषाणाऐसें नाहीं सार । मनुष्य तें काये पामर । पाषाणापुढें ॥ १७ ॥

मराठी अर्थ

अशा प्रकारें विचार केला तर पाषानाचें मूल्य कितीतरी आहे. हें लक्षांत येईल. अर्थात त्यापुढें माणसाची किंमत कमीच आहे असें म्हणावयास हवे.

English meaning

And when by means of this `speech', you understand thoughtlessness then, there is none more excellent than this stone. Before this stone (ie. that steadfast conviction, I do not exist), what is a lowly man?

18
मूळ

तरी तो ऐसा नव्हे पाषाण । जो अपवित्र निःकारण । तयासारिखा देह जाण । दुश्र्चीत अभक्तांचा ॥ १८ ॥

मराठी अर्थ

पण जो पाषाण चांगल्या कामासाठीं उपयोगी पडत नाही, तो अपवित्र व कुचकामी असतो. श्रद्धाहीन व व्यग्रचित्ताच्या अभक्ताचा देह त्या पाषाणासारखा अपवित्र व कुचकामाचा समजावा.

English meaning

When that purush is not like this stone then, he is impure and of no use. For he takes himself to be a body and has the inattentiveness of a non-devotee.

19
मूळ

आतां असो हें बोलणें । घात होतो दुश्र्चीतपणें । दुश्र्चीतपणाचेनि गुणें । प्रपंच ना परमार्थ ॥ १९ ॥

मराठी अर्थ

आतां हें बोलनें पुरें. दुश्चितपणानें माणसाचा घात होतो. दुश्चितपणा अंगीं असेल तर माणसाचा घात होतो. धड प्रपंच नाहीं व धड परमार्थ नाहीं अशी अवस्था होते.

English meaning

Now there should be this `speech', for if there is inattentiveness (ie. body consci- ousness) then, one will surely die. Due to these gunas of inattentiveness there is only prapanch and no paramarth (ie. one is confined within the five elements and is not vast beyond imagination).

20
मूळ

दुश्र्चीतपणें कार्य नासे । दुश्र्चीतपणें चिंता वसे । दुश्र्चीतपणें स्मरण नसे । क्षण येक पाहातं ॥ २० ॥

मराठी अर्थ

दुश्चितपणानें कार्याचा नाश होतो. सदैव काळजी लागते व कोणत्याही गोष्टीचे धड स्मरण राहात नाही.

English meaning

Due to inattentiveness this action of the `all' is destroyed; due to inattentiveness, anxiety exists and due to inattentiveness there is no remembrance of that endless `mo- ment of the One'.

21
मूळ

दुश्र्चीतपणें शत्रुजिणें । दुश्र्चीतपणें जन्ममरणें । दुश्र्चीतपणाचेनि गुणें । हानी होये ॥ २१ ॥

मराठी अर्थ

दुश्चितपणामुळें जीवन नकोसें वाटते. तें शत्रूसारखें ताप देतें. जन्ममरण मागें लागते. सर्वप्रकारें नुकसान होते.

English meaning

Due to inattentiveness one is conquered by the enemy (ie. ego). Due to inattentive- ness there is birth and death and due to this quality of inattentiveness one harms one's own Self.

22
मूळ

दुश्र्चीतपणें नव्हें साधन । दुश्र्चीतपणें न घडे भजन । दुश्र्चीतपणें नव्हे ज्ञान । साधकांसी ॥ २२ ॥

मराठी अर्थ

दुश्चितपणामुळें साधन घडत नाही. भजन घदत नाही. साधकाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही.

English meaning

Due to inattentiveness there is no sadhana and due to inattentiveness, bhajan is not accomplished. Due to inattentiveness, the sadhak does not acquire knowledge.

23
मूळ

दुश्र्चीतपणें नव्हे निश्र्चयो । दुश्र्चीतपणें न घडे जयो । दुश्र्चीतपणें होये क्षयो । आपुल्या स्वहिताचा ॥ २३ ॥

मराठी अर्थ

दुश्चितपणामुळें मनाचा निश्र्चय होत नाही. कार्यांमध्यें यश मिळत नाही. तसेच त्यामुळें आत्महिताचा क्षय होतो.

English meaning

Due to inattentiveness there is no conviction and due to inattentiveness there is no victory. Due to inattentiveness our own Self-benefit is destroyed.

24
मूळ

दुश्र्चीतपणें न घडे श्रवण । दुश्र्चीतपणें न घडे विवरण । दुश्र्चीतपणें निरुपण । हातीचें जाये ॥ २४ ॥

मराठी अर्थ

दुश्चितपणामुळें श्रवण नीट होत नाही. श्रवण केलेल्या विषयाचे नीट विवरण करतां येत नाही. त्यामुळें श्रवण केलेला परमार्थ बुद्धीमध्यें नीट सांठवून ठेवता येत नाही.

English meaning

Due to inattentiveness, shravan does not happen and due to inattentiveness thou- ghtlessness does not appear. Due to inattentiveness this discourse is not understood.

25
मूळ

दुश्र्चीत बैसलाचि दिसे । परी तो असतचि नसे । चंचळ चक्रीं पडिलें असे । मानस तयाचें ॥ २५ ॥

मराठी अर्थ

दुश्चितमाणूस एका जागीं बसलेला दिसतो, पण तो तेथें असून नसल्यासारखा असतो. त्याचें मन चंचलपणें निरनिराळ्या विशयांमध्यें चकरा मारीत असते.

English meaning

When one sinks into inattentiveness then one sees through the senses and that brahman who is, is as if not. Then that Reality is a mind fallen into a never-ending whirl.

26
मूळ

वेडें पिशाच्च निरंतर । अंध मुके आणी बधिर । तैसा जाणावा संसार । दुश्र्चीत प्राणीयांचा ॥ २६ ॥

मराठी अर्थ

एखाद्या वेड्या, सारखी पिशाचबाधा असणार्‍या माणसाचा किंवा आंधळ्या, मुक्या आणि बहिर्‍या माणसाचा सांसार जसा कांहींतरी असतो तसाच दुश्चित माणसाचा संसार असतो.

English meaning

Due to this madness there is the chasing after sense objects and that parabrahman is blind, deaf and dumb. This inattentiveness of the one in the prana should be known as samsar.

27
मूळ

सावध असोन उमजेना । श्रवण असोन ऐकेना । ज्ञान असोन कळेना । सारासारविचार ॥ २७ ॥

मराठी अर्थ

लक्ष देतो असेम दिसतें पण त्याचे लक्ष नसते, ऐकतो असे दिसतें पण त्याला आकलन होत नसते. आणि ज्ञान आहे असे दिसतें पण त्याला खरें काय व खोटे काय हें त्याला समजत नसते.

English meaning

Then though your nature is ever alert still, you have not awoke to that; though you are shravan, still you do not listen and though you are pure knowledge still, you do not understand that essence that is thoughtlessness.

28
मूळ

ऐसा जो दुश्र्चीत आळसी । परलोक कैंचा त्यासी । जयाचे जिवीं अहिर्निशी । आळस वसे ॥ २८ ॥

मराठी अर्थ

जो माणूस असा दुश्चित आहे आणि शिवाय आळशी आहे त्याच्या बद्दल कांहीं बोलावयासच नको. जो सदासर्वदा आळसांत घालवतो त्यास परमार्थ साधणें अगदी अशक्य आहे.

English meaning

When that purush is inattentive and lazy then, how can that world beyond be gained? For then in the jiva, born from mula maya, there dwells laziness day and night.

29
मूळ

दुश्र्चीतपणाोासुनि सुटला । तरी तो सवेंच आळस आला । आळसाहातीं प्राणीयांला । उसंतचि नाहीं ॥ २९ ॥

मराठी अर्थ

जर एखादा माणूस दुश्चितपणांतून सुटला तरी आळस त्यास ग्रासून टाकतो. तो आळसाच्या इतका आहारीं जातो कीं आळसामुळें त्याला कांही करावयास फुरसतच मिळत नाही.

English meaning

If the jiva is allowed to flourish then, due to its inattentiveness, laziness will naturally arise. And the one who is lazy never takes any rest in the prana. (Laziness therefore does not mean, not doing anything; in fact it means doing so much that one has no time to do what one should do ie. shravan).

30
मूळ

आळसें राहिला विचार । आळसें बुडाला आचार । आळसें नव्हे पाठांतर । कांहीं केल्यां ॥ ३० ॥

मराठी अर्थ

आळसानें माणसाच्या विचारांची वाढ होत नाही. त्याचा आचारधर्म बुडतो. कांहीं केल्या पाठांतर होत नाही.

English meaning

Due to laziness, thoughtlessness is hindered. Due to laziness, pure conduct is drow- ned. Due to laziness, this created `thing' is not remembered.

31
मूळ

आळसें घडेना श्रवण । आळसें नव्हें निरुपण । आळसें परमार्थाची खूण । मळिण जाली ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

आळसानें श्रवण घडत नाही. निरुपण, प्रवचन यांचा फायदा करुन घेतां येत नाही. परमार्थाची साधना व प्रचीति मलिन होऊन जातात.

English meaning

Due to laziness, there is no appearance of shravan. Due to laziness, there is no sagun discourse. Due to laziness, the pure understanding of paramarth is spoiled.

32
मूळ

आळसें नित्यनेम राहिला । आळसें अभ्यास बुडाला । आळसें आळस वाढला । असंभाव्य ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

आळसानें नित्यनेम चालत नाही. अभ्यास होत नाही. आणि आळशीपणानें फार आळसच वाढतो.

English meaning

Due to laziness, continuous practice is stopped; due to laziness, study is drowned and due to laziness, laziness increases beyond all limits.

33
मूळ

आळसें गेली धारणा धृती । आळसें मळिण जाली वृत्ती । आळसें विवेकाची गती । मंद जाली ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

आळसानें धारणाशक्ति नाहींशी होते. धीर धरण्याची शक्ति नाश पावते. मनोवृत्ति मलीन होते. विवेकाची गती मंदावते.

English meaning

Due to laziness, patience and courage are not held firmly. Due to laziness, this knowing vritti gets spoiled and due to laziness this state of vivek becomes dull.

34
मूळ

आळसें निद्रा वाढली । आळसें वासना विस्तारली । आळसें सुन्याकार जाली । सद्बुद्धि निश्र्चयाची ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

आळसानें झोप घेण्याची सवय वाढते. वासना वाढतात. निश्चय करणारी सद्बुद्धि शून्य बनते.

English meaning

Due to laziness, sleep increases. Due to laziness, this vasana that simply wanted to exist, moves outward and there is body consciousness and due to laziness that conviction of a pure intellect dwells in nothing/zero. (The pure intellect/buddhi has the conviction that `Nothing is there' ie. space; the impure buddhi imagines that from this `nothing of space', `many' names and forms have appeared)

35
मूळ

दुश्र्चीतपणासवें आळस । आळसें निद्राविळास । निद्राविळासें केवळ नास । आयुष्याचा ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

आधींच दुश्चितपणा, त्यांत आळशीपणाची साथ मिळाली आणि निद्रेचा विलासही सुरु झाला. मगआयुष्याचा नाश होण्यास वेळ लागत नाही.

English meaning

Due to inattentiveness there is laziness and due to laziness there are the wanton pleasures and diversions of sleep (ie. this waking state is a sleep ie. maya of ignorance). Due to the diversions of this sleep that pure knowledge is destroyed for a whole lifetime.

36
मूळ

निद्रा आळस दुश्र्चीतपण । हेंचि मूर्खाचें लक्षण । येणेंकरितां निरुपण । उमजेचिना ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

निद्रा, आळस व दुश्चितपणा ही मूर्खाची लक्षणें आहेत. त्यामुळें उपदेश जरी केला तरी तो त्या माणसाच्या ध्यानांत येत नाही.

English meaning

When there is this sleep, laziness and inattentiveness then, that thoughtless Self has the attention of a fool because that discourse on the essence has not been awakened.

37
मूळ

हें तिन्ही लक्षणें जेथें । विवेक कैचा असेल तेथें । अज्ञानास यापरतें । सुखचि नाहीं ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

हे तीन दोष जेथें असतात तेथें विवेक राहूं शकत नाही. अज्ञानी माणसास आळस व झोप यापेक्षां दुसरें कोणतेंही सुख मोठे वाटत नाही.

English meaning

When your attention has these three then, how will there be the vivek of `there'? Then the ignorant believe that the greatest pleasure would be this `I am' (ie. they believe that this `I am' is the ultimate goal; maharaj- ninety-nine point nine percent of Saints have gone up to knowledge only).

38
मूळ

क्षुधा लागतां जेविला । जेऊन उठतां आळस आला । आळस येतां निजेला । सावकास ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

अशा अज्ञानी माणासास भूक लागली कीं पोटभर जेवला, जेवण झाल्यावर सुस्ती आली. आणि मग तो झोपतो.

English meaning

Hunger arises when one enjoys the fruits of past actions (ie. enjoying the fruits of our pass actions ie. karma, brings only a longing for the same enjoyments. Therefore leaving off these desires, disowning the thoughts and letting slip away without getting attached to them and letting whatever is going to come, come and whatever is going to go, go, is wisdom and attentiveness) and while enjoying these, laziness arises and this laziness brings `sleep' (this laziness means not making shravan and then one is fast asleep to their real nature and lost in these three worlds of waking, dream and sleep).

39
मूळ

निजोन उठतां दुश्र्चीत । कदा नाहीं सावचित । तेथें कैचें आत्महित । निरुपणीं ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

झोंप घेऊन उठला कीं मन व्यग्र असल्यानें कशाकडेही त्याचे लक्ष नसते. मनाच्या अशा अवस्थेंत निरुपण ऐकून कांहीं आत्महित करुन घेणें शक्यच नसते.

English meaning

Sleeping brings inattentiveness and no alertness. How can the Self/atma be gained when your discourse is "I am a body".

40
मूळ

मर्कटापासीं दिल्हे रत्न । पिशाच्याहातीं निधान । दुक्ष्चीतपुढें निरुपण । तयापरी होये ॥ ४० ॥

मराठी अर्थ

माकडाच्या हातीं रत्न दिलें किंवा पिशाच्याच्या हाती द्रव्याचा ठेवा दिला तर तो जसा वायं जातो. त्याचप्रमाणें दुश्चित माणसाला केलेला परमार्थाचा उपदेश वाया जातो.

English meaning

It is like giving a diamond to a monkey or a treasure to a madman. When the nirgun discourse is placed in front of inattentiveness then, that Reality becomes this inattentiveness.

41
मूळ

आतां असो हे उपपत्ती । आशंकेची कोण गती । कितां दिवसां होते मुक्ती । सज्जनाचेनि संगें ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

अज्ञानाच्या लक्षणांचे हें विवेचन आतां पुरें झाले. मूळ प्रश्र्णाचे उत्तर काय तें आतां पाहूं. मूळ प्रश्र्ण असा कीं सत्समागम केल्यास मुक्ति मिळण्यास किती दिवस लागतात ?

English meaning

But when there is that thoughtless and conclusive proof then, how can even this doubt `I am' remain? Then due to the company of the Saint/sajjana, these `many' days of the mind (ie. a mind that sees a past, present and future) attain Final Liberation (ie. freedom from time and space).

42
मूळ

ऐका याचें प्रत्योत्तर । कथेसि व्हावें निरोत्तर । संतसंगाचा विचार । ऐसा असे ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

या प्रश्र्णाचें उत्तर आतां ऐका. या उत्तरानें प्रश्र्ण विचारणार्‍यांची शंका संपूर्ण नाहींशी होईल. संतसमागमाचा विचार पुढिलप्रमाणें आहे.

English meaning

Listen first to this reply `I am' and when in the good listener this reply does not arise and there is thoughtlessness then, that is the company of the Saint.

43
मूळ

लोहो परीसेसी लागला । थेंबुटा सागरीं मिळाला । गंगे सरिते संगम जाला । तत्क्षणीं ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

लोखंड परिसाला लागलें, पाण्याचा थेंब समुद्रांत पडला, एक नदी गंगेला येऊन मिळाली; ज्या क्षणीं हें घडतें त्याच क्षणीं लोखंड सोनें बनते, थेंब सागर बनतो, आणि नदी गंगारुप बनते.

English meaning

When the iron touches the paris stone; when the drop of water falls in the sea; when the stream meets the ganga then, the change is instantaneous.

44
मूळ

सावध साक्षपी आणी दक्ष । तयास तत्काळचि मोक्ष । इतरांस तें अलक्ष । लक्षिलें नवचे ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

त्याच प्रमानें जो अत्यंत सावध आहे, कष्टाळू आहे, आणि तत्पर आहे त्यास सत्समागमामुळें ताबडतोप मोक्ष मिळतो. ज्यांच्या अंगीं हें गुण नाहीत त्यांस अत्यंत सूक्ष्म ब्रह्मस्वरुप पाहूं म्हटले तरी पाहता येत नाही.

English meaning

When one is alert, determined and clever then, at that very moment, that Reality attains its Liberation. Others cannot place their attention on That which is beyond all attention (knowledge is within the mind, it is a mind or attention freed of concepts and desires. But you cannot kill yourself; for this the Master is required)

45
मूळ

येथें शिष्यप्रज्ञाच केवळ । प्रज्ञावंतां न लगे वेळ । अनन्यास तत्काळ । मोक्ष लाभे ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

परमार्थाच्या अनुभवासाठीं शिष्याची बुद्धी तयार व्हावी लागते. सूक्ष्म बनावी लागते. अशी बुद्धी ज्याच्याजवळ असते त्यास वेळ लागत नाही. जो अनन्य होऊं शकतो त्यास ताबडतोप मोक्ष मिळतो.

English meaning

When the understanding of the disciple `here' becomes that pure knowledge `there' then, the possessor of such understanding does not need these times of the `many' and at that very moment, the One attains Its Liberation (leaving aside yesterday and tomorrow and be in the `now' and then, have faith in your thoughtless Self and let this `I' slip away).

46
मूळ

प्रज्ञावंत आणी अनन्य । तयास नलगे येक क्षण । अनन्य भावार्थेंविण । प्रज्ञा खोटी ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

ज्याची बुद्धि अत्यंत सूक्ष्म आहे आणि जो अनन्य होऊं शकतो त्यास स्वरुपसाक्षात्कार होण्यास एक क्षण देखील लागत नाही. अनन्य श्रद्धा असल्यावाचून नुसती सूक्ष्म बुद्धि कामास येत नाही .

English meaning

When one is the possessor of such understanding and no-otherness then, that One does not require this `moment' even (ie. the `now' is also not true). But if there is no devotion to `no-otherness' then, your understanding is a misunderstanding.

47
मूळ

प्रज्ञेविण अर्थ न कळे । विश्र्वासेंविण वस्तु ना कळे । प्रज्ञाविश्र्वासें गळे । देहाभिमान ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

सूक्ष्म बुद्धि नसेल तर सद्गुरु जें सांगतात त्याचा अर्थ बरोबर कळत नाहीं. अनन्य श्रद्धा नसेल तर आत्मवस्तु आकलन होत नाही. म्हणून प्रज्ञा व विश्वास दोन्ही आवश्यक त्यानें देहाभिमान नाहींसा होतो.

English meaning

Without the understanding of `no-otherness', the meaning cannot been realised. Without faith and devotion, that Self cannot be understood but through faith and devotion to the nirgun Self, the egos of all four bodies disappear.

48
मूळ

देहाभिमानाचे अंतीं । सहजचि वस्तुप्राप्ती । सत्संगे सद्वती । विलंबचि नाहीं ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

मी देह आहे ही भावना नाश पावली कीं अगदी सहजतेने आत्मवस्तु लाभते. अशा रीतीनें सत्संगतीमुळें उत्तम गति लाभण्यास वेळ लागत नाही.

English meaning

When there is an end to body ego then, the Self is naturally attained. When you keep the company of the Truth/Saint then, there is no delay in the attainment of your True State.

49
मूळ

सावध साक्षपी विशेष । प्रज्ञावंत आणी विश्र्वास । तयास साधनीं सायास । करणेंचि नलगे ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

जो मनुष्य आपल्या ध्येयाविषयीं जागरुक असतो, पुष्कळ श्रम करण्यास तयार असतो, प्रज्ञावंत असून बुद्धीमान असतो आणि जो खरा श्रद्धावान आहे त्याला साधनाचे कष्ट करावें लागत नाहीत.

English meaning

When you are constantly alert to that most excellent guna then, you are the possessor of understanding and faith. Then that Reality no longer needs to toil in the doings of `many' sadhana.

50
मूळ

इतर भाविक साबडे । तयांसहि साधनें मोक्ष जोडे । साधुसंगें तत्काळ उडे । विवेकदृष्टी ॥ ५० ॥

मराठी अर्थ

इतर जे श्रद्धावंत पण भोळे असतात त्या माणसांनादेखील साधन केल्यानंतर मोक्ष हातीं येतो. सत्समागमानें त्यांच्या अंतर्यामी विवेकशक्ति निर्माण होते.

English meaning

When this `other'/`I am' has pure faith then, by such sadhana, Final Liberation even will be attained. For due to the company of the sadhu, there is the seeing with vivek.

51
मूळ

परी तें साधन मोडूं नये । निरुपणचा उपाये । निरुपणें लागे सोय । सर्वत्रांसी ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

आत्मदर्शन झाल्यानंतरसुद्धाम निरुपणाचा नियम मोडूं नये. आपली साधना सोडूं नये. सर्व सामान्यांना निरुपणामुळें आत्मदर्शनाचा मार्ग समजतो. ते थोडी वाटचाल करुं शकतात.

English meaning

But you should not break this sadhana that is the discourse `I am'. Due to this discourse with the `all', complete contentment is established.

52
मूळ

आतां मोक्ष आहे कैसा । कैसी स्वरुपाची दशा । त्याचे प्राप्तीचा भर्वसा । सत्संगें केवी ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

आतां मोक्ष मोक्ष म्हणतात तो आहे तरी कसा, स्वरुपदर्शनाची अवस्था कशी असते, सत्समागम केल्यानें स्वरुपदर्शन होतें याची खात्री काय ?

English meaning

Then where is this liberation of the `all' (where is jivan mukta when videha mukti has been attained)? Where is this state `I am' when there is that *swarup? And when there is the company of the Truth then, how can there be the promise of the attainment of that paramatma? He is as He always is. *(maharaj- the stateless state)

53
मूळ

ऐसें निरुपण प्रांजळ । पुढें बोलिलें असे सकळ । श्रोतीं होऊनियां निश्र्चळ । अवधान द्यावें ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

या प्रश्र्णांच्या उत्तरांचे विवेचन पुढील समासांत साकल्यानें केलें आहे. श्रोत्यांनी स्थिर मनानें त्याकडे लक्ष द्यावें.

English meaning

Now that this discourse has been clearly made and there is this `speech' of the `all', the true listener should give their complete attention to this and then be that still swarup (this `I am' discourse is always there, whether we understand it or not, this thing called the `all' or existence is the base of every jiva).

54
मूळ

अवगुणत्यागावयाकारणें । न्यायनिष्ठुर लागे बोलणें । श्रोतीं कोप न धरणें । ऐसिया वचनाचा ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

श्रवण करणार्‍याचे अवगुण जर सुटावयास हवें असतील तर वक्त्याला कडकपणें खरें बोलावें लागतें. श्रोत्यांनी अशा न्यायनिष्ठूर बोलण्याचा राग मानूं नये.

English meaning

By means of this `I am', the wrong gunas are given up and this `speech' is firmly established. When in the listener there is not the holding of the rotten and flawed (ie. inattentiveness of body consciousness) then, there is this divine `speech' of `I am' (ie. attentiveness). .