मायोद्भव अथवा ज्ञानदशक — समास 7: मोक्षलक्षण

Fully populated

Moksha Lakshan (The Characteristics of Liberation)

Original & Marathi meaning source: Stotra (hymns) blog by Prakash Ketkar (ioustotra.blogspot.com) — original owi text and Marathi meaning

English meaning source: Dasbodh, English translation by John Norwell (2015)

Owi 31's original verse was split by a quoted Sanskrit half-shloka (a single line, ending in one danda rather than the usual full verse close, quoting the Gita's आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः) plus its own Marathi gloss reusing the label अर्थ that ordinarily marks a real owi's own meaning - the two original-verse fragments before and after that insertion were manually reunited after verifying both belong to the same owi.

1
मूळ

मागां श्रोतयांचा पक्ष । कितां दिवसां होतो मोक्ष । तेचि कथा श्रोते दक्ष । होऊन ऐका ॥ १ ॥

मराठी अर्थ

मागें श्रोत्यांनी असें विचारलें कीं, मोक्ष मोळण्यास किती दिवस लागतात ? त्याचे उत्तर श्रोत्यांनी सावधपणें ऐकावे.

English meaning

Previously it was the opinion of the listener, that after `many' days liberation is gained. But such liberation is still the `I am'* of an alert listener. Therefore continue to listen carefully. *(This liberation is sagun; one stops regarding oneself as a gross body and feels `I pervade all this'. But `I' still remains)

2
मूळ

मोक्षास कैसें जाणावें । मोक्ष कोणास म्हणावें । संतसंगें पावावें । मोक्षास कैसें ॥ २ ॥

मराठी अर्थ

मोक्षाला कसें ओळखावें ? मोक्ष कशाला म्हणावें ? संतसंगानें मोक्ष कसा काय प्राप्त होतो ?

English meaning

"What then should be known as liberation? Should this `all' be called liberation? And what is that liberation that is attained by the company of Truth?"

3
मूळ

तरी बद्ध म्हणिजे बांधला । आणी मोक्ष म्हणिजे मोकळा जाला । तो संतसंगें कैसा लाधला । तेंहि ऐका ॥ ३ ॥

मराठी अर्थ

बद्ध म्हणजे बांधलेला. मोक्ष म्हणजे बंधनांतून मोकळा झालेला. संतसंगतीनें बांधलेला मोकळा कसा होतो तें आतां ऐका.

English meaning

If bondage means to be tied down then, liberation means to become open and free. But how can that paramatma gain liberation in the company of the Truth when He is forever free? Therefore carefully listen! (A liberation gained by the forever free can not be real liberation, but merely the concept of being free)

4
मूळ

प्राणी संकल्पें बांधला । जीवपणें बद्ध जाला । तो विवेकें मुक्त केला । साधुजनीं ॥ ४ ॥

मराठी अर्थ

प्राणी संकल्पानें बांधला जातो. मी जीव आहे असा बद्धपणा त्याला येतो. साधुपुरुष जीवाला आत्मानात्मविवेक शिकवून बंधनांतून मोकळा करतात.

English meaning

Due to this original concept/sankalpa `I am', there is the *binding in the prana and due to this jiva-ness, a baddha/bonded appears (see 5.7, "I am a body"). But if there is proper vivek then, that sadhu dwelling within the wandering mind attains Final Liberation (within each mind there is that Reality). *(This `I am' is a liberation from the bondage of gross body consciousness in the prana; yet it is the binding of that Reality to this `all' body)

5
मूळ

मी जीव ऐसा संकल्प । दृढ धरितां गेले कल्प । तेणें प्राणी जाला अल्प । देहबुद्धीचा ॥ ५ ॥

मराठी अर्थ

मी जीव आहे असा संकल्प केला.तो मनांत बराच काळ धरुन ठेवला. त्यामुळें जीवाची देहबुद्धि घट्ट झाली. मी देहापुरता लहान आहे. अल्प आहे. आकुंचित आहे अशी त्याची मनोवृत्ती झाली.

English meaning

"I am a jiva". When your sankalpa has become like this and you hold on to this tightly then, this alternative, `I am shiva', gets destroyed. Then that Reality has the conviction that it is a small and insignificant body in the prana.

6
मूळ

मी जीव मज बंधन । मज आहे जन्ममरण । केल्या कर्माचें फळ आपण । भोगीन आतां ॥ ६ ॥

मराठी अर्थ

मग प्राण्याला असें वाटते कीं, मी जीव आहे, मी बांधलेला आहे, मला जन्ममरण आहे. मीच केलेल्या कर्माचे फळ मला आतां भोगावयाचें आहे.

English meaning

"I am jiva, I am bound, I was born and I will die and now I will suffer the karma of what I have done in the past."

7
मूळ

पापाचे फळ तें दुख । आणी पुण्याचे फळ तें सुख । पापपुण्य अवश्यक । भोगणें लागे ॥ ७ ॥

मराठी अर्थ

पापकर्माचें फळ म्हणून दुःख भोगावें लागते. पुण्य कर्माचे फळ म्हणून सुख भोगावयास मिळते. पाप पुण्याचे फळ भोगल्यावाचून सुटका नाही.

English meaning

Then there is the fruit of sin and that Reality suffers and then there is the fruit of merit and that Reality has pleasure. For when there is the feeling "I am a jiva" then, these sins and merits of karma will surely have to be endured.

8
मूळ

पापपुण्यभोग सुटेना । आणी गर्भवासहि तुटेना । ऐसी जयाची कल्पना । दृढ जाली ॥ ८ ॥

मराठी अर्थ

पापपुण्याचे फळ भोगावेच लागते त्यामुळें जन्म घेणेंही कांहीं सुटत नाही. अशी त्याची कल्पना दृढ झालेली असते.

English meaning

"These sins and merits cannot be avoided; nor can the stay in the womb be avoided." When this `I am' holds firm to this concept then,

9
मूळ

तया नांव बांधला । जीवपणें बद्ध जाला । जैसा स्वयें बांधोन कोसला । मृत्य पावे ॥ ९ ॥

मराठी अर्थ

अशा त्याला बांधलेला म्हणतात. जीवपणानें, मी जीव आहें या भावनेनें तो बांधलेला असतो. रेशमाचा किडा स्वतःच रेशमाचा कोश निर्माण करतो आणि त्यांत अडकून गुदमरुन मरुन जातो. त्याचप्रमाणें जीव आपणच संकल्प करतो आणि तो घट्ट झाला कीं जन्ममरणाच्या चक्रांत अडकतो.

English meaning

There comes the binding of being a jiva and that Reality gets called a baddha/one who is bound. He is just like the silk-worm which binds itself in its own cocoon and dies there.

10
मूळ

तैसा प्राणी तो अज्ञान । नेणे भगवंताचें ज्ञान । म्हणे माझें जन्ममरण । सुटेचिना ॥ १० ॥

मराठी अर्थ

सामान्य प्राणी अज्ञानी असल्यानें त्याला भगवंताचें ज्ञान नसते. त्याला वाटते कीं आपल्यामागें लागलेले जन्ममरणाचे चक्र कांहीं केल्या सुटणार नाहीं.

English meaning

In this same way, that paramatma has bound itself in the prana. Then it is ignorant as it does not have the knowledge of God and so it says, "My birth and death are unavoidable." (That eternal paramatma has fallen into body consciousness and thinks itself to be a non-eternal jiva)

11
मूळ

आतां कांहीं दान करुं । पुढिल्या जन्मास आधारु । तेणें सुखरुप संसारु । होईल माझा ॥ ११ ॥

मराठी अर्थ

मग तो अशी कल्पना करतो कीं, या जन्मीं आपण कांहीं दान केलें तर पुढल्या जन्मी तें आपल्याला उपयोगास येईल व त्या पुण्यानें आपला संसार सुखाचा होईल.

English meaning

Then he says, "Now, something should be given away. This will support me in my life ahead and then my samsar will be pleasurable."

12
मूळ

पूर्वीं दान नाहीं केलें । म्हणोन दरिद्र प्राप्त जालें । आतां तरी कांहीं केलें । पाहिजे कीं ॥ १२ ॥

मराठी अर्थ

मागल्या जन्मी आपल्याकडून कांहीं दान केलें गेलें नाही म्हणून ह्या जन्मी आपण दरिद्रि झालो. म्हणून या जन्मीं तरी कांहींतरी दान केलें पाहिजे.

English meaning

He says, "Previously nothing had been donated and therefore the misery of poverty has come to me"

13
मूळ

म्हणौनी दिलें वस्त्र जुनें । आणी एक तांब्र नाणें । म्हणे आतां कोटिगुणें । पावेन पुढें ॥ १३ ॥

मराठी अर्थ

म्हणून तो एक जुनें वस्त्र आणि एक तांब्याचा पैसा दान करतो. मनांत कल्पना करतो कीं या दानचे फळ पुढिल जन्मी कोटिगुणानें मला मिळेल.

English meaning

Therefore that One gives away some old clothes and a few copper coins and says, "Now I will acquire the most excellent qualities ahead"

14
मूळ

कुशावर्तीं कुरुक्षेत्रीं । महिमा ऐकोन दान करी । आशा धरिली अभ्यांतरीं । कोटिगुणांची ॥ १४ ॥

मराठी अर्थ

कुशावर्त व कुरुक्षेत्र या क्षेत्रीं दान केल्यास फळ अमाप मिळते. म्हणून या क्षेत्रीं जाऊन दान करतो व आशा बाळगतो कीं, पुढिल जन्मी याचें फळ भरपूर मिळेल.

English meaning

He had heard about the importance of some pilgrimage places and so he went there and donated something. Then within there was hope for those most excellent qualities.

15
मूळ

रुका आडका दान केला । अतितास टुकडा घातला । म्हणे माझा ढीग जाला । कोटि टुकड्यांचा ॥ १५ ॥

मराठी अर्थ

तो एखादा पैसा किंवा अडका दान करतो किंवा अतिथीस एखादा भाकरीचा तुकडा खायला देतो. मनांत कल्पना करतो कीं मला पुढिल जन्मी कोटि तुकड्यांची रास मिळेल.

English meaning

He gave away a tiny piece of land and gave some food to a passing stranger. And then he said, "This will all come back to me a billion fold."

16
मूळ

तो मी खाईन पुढिलिये जन्मीं । ऐसें कल्पी अंतर्यामीं । वासना गुंतली जन्मकर्मीं । प्राणीयांची ॥ १६ ॥

मराठी अर्थ

पुढल्या जन्मीं आपण ती खाऊं अशी भ्रामक कल्पना तो मनांत करतो. अशा प्रकारें जन्म घेण्यांत आणि कर्माचें फळ भोगण्यांत माणसाची वासना गुंतून राहते.

English meaning

That atma said, "In my next birth, I will eat so well on account of this" But when he imagines this then, this vasana gets entangled in the karma of a birth within the prana.

17
मूळ

आतां मी जें देईन । तें पुढिले जन्मीं पावेन । ऐसें कल्पी तो अज्ञान । बद्ध जाणावा ॥ १७ ॥

मराठी अर्थ

या जन्मीं जें आपण दान केलें त्याचे फळ पुढच्या जन्मीं अनेक पटीनें आपल्याला मिळेल अशी कल्पना करणारा अज्ञानी असतो. तोच बद्ध असतो असें ओळखावें.

English meaning

"Whatever I give away now will be returned to me with interest in my next birth." But due to such a concept, that atma remains ignorant and should be known as a baddha/one who is bound.

18
मूळ

बहुतां जन्माचे अंतीं । होये नरदेहाची प्राप्ती । येथें न होतां ज्ञानें सद्गती । गर्भवास चुकेना ॥ १८ ॥

मराठी अर्थ

पुष्कळ जन्म घेऊन झाल्यावर मानवदेह मिळतो. मानवाचा जन्म घेऊन जर आपण अज्ञानीच राहीलो, आत्मज्ञान करुन घेतलें नाहीं तर जीवाला सद्गती मिळत नाही. व जन्ममरण कांहीं चुकत नाही.

English meaning

This `all' has entered into this birth and has acquired the body of a human being. If this knowledge `here' does not acquire that (thoughtless) True State `there' then, the cycle of births cannot be avoided.

19
मूळ

गर्भवास नरदेहीं घडे । ऐसें हें सर्वथा न घडे । अकस्मात भोगणें पडे । पुन्हा नीच योनी ॥ १९ ॥

मराठी अर्थ

या जन्मांत आत्मज्ञान न होतां मृत्यु आला तर पुन्हागर्भवासामध्यें नरदेहच मिळेल असें घडणें फार विरळ असतें. उलट त्या जीवाला एकाएकी खालच्या योनीमध्यें जन्म घ्यावा लागतो.

English meaning

There has been so many births in a human body and in these, that thoughtless swarup has not been accomplished. And suddenly, due to experiences of pleasures and pains, that constant and continuous atma again falls into this birth (ie. at the moment you are He; when the mind becomes quiet and names and forms drop away then, at that moment, you know that you are knowledge. But as soon as a desire for pleasure arises and the mind chases after that then suddenly, body consciousness arises and one falls into this birth. Every morning when you awake, knowledge awakes and every morning when you begin to think of this world, you enter into this birth. When the day is spent chasing after desires, you affirm this "I am a body' concept and then how can that atma be achieved?).

20
मूळ

ऐसा निश्र्चयो शास्त्रांतरीं । बहुतीं केला बहुतांपरीं । नरदेह संसारीं । परम दुल्लभ असे ॥ २० ॥

मराठी अर्थ

पुष्कळ सास्त्रकारांनीं निरनिराळ्या सास्त्रांमध्यें अनेक प्रकारें हीच गोष्ट निश्र्चयानेम सांगितली आहे. थोडक्यांत संसारामध्यें नरदेह मिळणें फार दुर्लभ आहे.

English meaning

Now, when one has faith in the shasthras (neti, neti/not this, not that) then, that One who is within everyone becomes like this `all' (That One/atma gives up body consciousness and feels `I am everywhere' ie. consciousness). But when you stay in samsar and hold on to body consciousness then, that Supreme is the most difficult to acquire.

21
मूळ

पापपुण्य समता घडे । तरीच नरदेह जोडे । येरवीं हा जन्म न घडे । हें व्यासवचन भागवतीं ॥ २१ ॥

मराठी अर्थ

पाप आणि पुण्य यांचें प्रमाण सम होतें तेव्हांच मानवदेह मिळतो. तें प्रमाण सम नाहीं तोपर्यंत मानवदेह मिळत नाहीं असें भगवतामध्यें व्यासांचे वचन आहे.

English meaning

It is said that when your sins and virtues are of equal measure then, you acquire a human body. Still, if there is this divine `speech' of vyasa then, you are a devotee of vishnu and that thoughtless Self does not take a birth. (vyasa is the accomplished Saint or siddha and vishnu means to know. When you are devoted to just knowing then, these body thoughts do not arise and therefore that one who is knowledge does not take birth in the body. And if you stay in this `speech' then, this will also slip away and when you do not remain then, what remains is the Saint, just like vyasa)

22
मूळ

नरदेह दुल्लभ । अल्पसंकल्पाचा लाभ । गुरु कर्णधारी स्वयंभ । सुख पाववी ॥ २२ ॥

मराठी अर्थ

नरदेह दुर्लभ आहे. पण देहबुद्धीनें केलेल्या अल्प संकल्पानें तो प्राप्त होतो. तो प्राप्त झाल्यावर सद्गुरु कर्णार करावा. तो मार्गदर्शक असतो. त्याच्या वचनानुसार वागल्यास सुखप्राप्ती होते.

English meaning

When there is the human body then, that Supreme is most difficult to acquire. For then this *sankalpa `I am' acquires this small body. But if the Self-illuminated guru is made your helmsman then, you can gain happiness. *(This original sankalpa of `I am' has become the thought, "I am a body")

23
मूळ

दैव अनुकूल नव्हे जया । स्वयें पापी तो प्राणीया । भवाब्धी न तरवे तया । आत्महत्यारा बोलिजे ॥ २३ ॥

मराठी अर्थ

दैवाची अनुकूलता ज्याला नाही तो स्वतः पापी असतो. हा भवसागर त्याला तरुन जाता येत नाहीं म्हणून तो आत्मघातकी समजावा.

English meaning

When God and this `I am' are not in agreement (God is the purush and this `I am' is prakruti; but if they disagree then, their intimate connection is broken and they forget each other) then, that purush becomes a sinner in the prana and cannot be rescued from this ocean of worldly existence. Then he should be regarded as a killer of the atma (due to body consciousness one kills one's own atma and therefore one must suffer old age and die).

24
मूळ

ज्ञानेंविण प्राणीयांसी । जन्ममृत्य लक्ष चौर्‍यासी । तितुक्या आत्महत्या त्यासी । म्हणौन आत्महत्यारा ॥ २४ ॥

मराठी अर्थ

ज्या प्राण्याला आत्मज्ञान नसतें त्याला चौर्‍यांशी लक्ष वेळां जन्म घ्यावा लागतो व मरावेम लागते. जितक्या वेळां तो ज्ञानहीन मरतो तितक्यावेळां त्यास आत्महत्या घडते. म्हणून तो आत्मघातकी समजावा.

English meaning

If knowledge is not gained then, there is birth and death in the prana due to the attention that brings the eight-four principles of a jiva. By becoming a jiva that atma is killed and therefore one should be regarded as a killer of the atma.

25
मूळ

नरदेहीं ज्ञानेंविण । कदा न चुके जन्ममरण । भोगणें लागती दारुण । नाना नीच योनी ॥ २५ ॥

मराठी अर्थ

मानवदेह मिळूनही जो आत्मज्ञान करुन घेत नाही त्याचे जन्म मरण कांहीं चुकत नाही. त्याला अत्यंत हलक्या योनीमध्यें जन्म घ्यावें लागतात.

English meaning

If in the human body this knowledge is not gained then, birth and death can never be avoided. And if this knowledge is not gained then, that constant and continuous atma has to endure the terrible sufferings of birth in `many' creatures.

26
मूळ

रीस मर्कट श्र्वान सूकर । अश्र्व वृषभ म्हैस खेचर । काक कुर्कुट जंबुक मार्जर । सरड बेडूक मक्षिका ॥ २६ ॥

मराठी अर्थ

अस्वल, माकड, कुत्रा, डुक्कर, घोडा, बैल, रेडा, गाढव, कावळा, कोंबडा, कोल्हा, मांजर, सरडा, बेडूक, माशी,

English meaning

There is the bear, monkey, pig, dog, horse, bull, buffalo and donkey. There is the crow, chicken, fox, cat, lizard, frog and fly.

27
मूळ

इत्यादिक नीच योनी । ज्ञान नस्तां भोगणें जनीं । आशा धरी मूर्ख प्राणी । पुढिलिया जन्माची ॥ २७ ॥

मराठी अर्थ

इत्यादि अगदी हलक्या योनीमध्यें आत्मज्ञान नसेल तर माणसांना जन्म घ्यावें लागतात. असें असूनही मू्र्ख माणसें पुढील जन्माची आशा बाळगतात.

English meaning

If knowledge has not been gained then, these and more are the births that have to be endured by that constant and continuous atma in this world. It is only the foolish in the prana that hold hopes for a birth ahead. (Here it does not say that one who has taken a human birth will have to take a birth in another form of creature; it says birth cannot be avoided and surely there can be no worse suffering than the sufferings of mankind; maharaj- when you dream, you never dream you are a dog or a horse)

28
मूळ

हा नरदेह पडतां । तोंचि पाविजे मागुतां । ऐसा विश्र्वास धरितां । लाज नाहीं ॥ २८ ॥

मराठी अर्थ

सध्याचा मनुष्यदेह मृत्यु पावल्यावर पुन्हा तसाच मानवदेह आपल्याला मिळेल असा भरवंसा धरणार्‍यास लाज कशी वाटत नाहीं ?

English meaning

That thoughtless Self has tumbled down into a human body and that Self/atma should be acquired again. Therefore one should hold such faith that has no shame (be shameless, care for no-one and nothing except your Master's grace; maharaj- you care for what the people will say).

29
मूळ

कोण पुण्याचा संग्रहो । जे पुन्हा पाविजे नरदेहो । दुराशा धरिली पाहो । पुढिलिया जन्माची ॥ २९ ॥

मराठी अर्थ

आपल्याजवळ असा कोणत्या पुण्याचा संग्रह आहे कीं, ज्याच्यायोगे पुन्हा नरदेहच आपल्याला मिळेल ? याची खात्री नसतांना हा मूर्ख पुढच्या जन्माची खोटी आशा धरुन राहतो.

English meaning

"If you have a storehouse of merit then, you will again acquire a human birth." When that One holds to this deluded hope then ahead, that atma will take another birth.

30
मूळ

ऐसें मूर्ख अज्ञान जन । केलें संकल्पें बंधन । शत्रु आपणासि आपण । होऊन ठेला ॥ ३० ॥

मराठी अर्थ

अशी मूर्ख व अज्ञानी माणसें आपल्या संकल्पानें स्वतःच बांधून घेतात. अशा रीतीनें मूर्ख माणूस स्वतःच स्वतःचा शत्रू बनतो.

English meaning

Such is the ignorance of the foolish people. Due to this sankalpa `I am', the bondage of "I am a body" has been created and you have become your own worst enemy.

31
मूळ

ऐसें संकल्पाचें बंधन । संतसंगें तुटे जाण । ऐक तयाचे लक्षण । सांगिजेल ॥ ३१ ॥

मराठी अर्थ

अशा रीतीनेम संकल्पाचें जें बंधन पडतें तें सत्समागमानें तुटतें. त्याचे लक्षण सांगतो तें ऐक.

English meaning

Know that in the company of the Truth, this binding sankalpa is broken. Therefore listen and then understand thoughtlessness.

32
मूळ

पांचा भूतांचें शरीर । निर्माण जालें सचराचर । प्रकृतिस्वभावें जगदाकार । वर्तो लागे ॥ ३२ ॥

मराठी अर्थ

आपलें शरीर पंचभूतांचे बनलेलें आहे. हें चराचर विश्वदेखील पंचभूतांचेच बनलेलें आहे. प्रकृतीच्या नियमानुसार जगामधील सर्व घटना घडत असतात. आपण ज्यांना निसर्गाचे नियम म्हणतो ते मूलतः प्रकृतीचे नियम असतात. म्हणून जगांत व्यवस्था आढळते. कार्यकारणभाव सत्ता गाजवतो.

English meaning

This `all' body containing the five great elements has been created and its appea- rance is this whole animate and inanimate creation. But then this spontaneous prakruti takes a form in this gross world and exists and functions as a jiva.

33
मूळ

देह अवस्था अभिमान । स्थानें भोग मात्रा गुण । शक्ती आदिकरुन लक्षण । चौपुटी तत्वांचे ॥ ३३ ॥

मराठी अर्थ

कांहीं शास्त्रकार असें सांगतात कीं, पिंडब्रह्मांडाची रचना चार तत्वांवर आधारलेली आहे. चार देह : स्थूल, सूक्ष्म, करण व महाकारण. चार अवस्था : जागृति, स्वप्न, सुषुप्ति व तुर्या. चार अभिमान : विश्व, तैजस, प्राज्ञ व प्रत्यगात्मा. चार स्थानें : नेत्र, कंठ, हृदय, व मूर्धा. चार भोग : स्थूल, प्रविविक्त, आनंद, व आनंदावभास. चार गुण : सत्त्व, रज, तन व शुद्ध सत्त्व. चार मात्रा : अ, उ, म, व अर्धमात्रा किंवा ईश्र्वर. चार शक्ति : इच्छा, क्रिया, द्रव्य, व ज्ञान.

English meaning

Then there are the four bodies, their states, their egos and their locations, their enjoyments, their vowels (ie. a,u,m and the half vowel) and their gunas. Then there are the powers of these four bodies, together with the gross elements (see 17.9). (Taking oneself to be a jiva brings objective knowledge and so many divisions and concepts and the eighty-four principles explained in 17.8)

34
मूळ

ऐसी पिंडब्रह्मांडरचना । विस्तारें वाढली कल्पना । निर्धारितां तत्वज्ञाना । मतें भांबावलीं ॥ ३४ ॥

मराठी अर्थ

अशीं एकूण बत्तीस तत्वें मिळून सारी पिंडब्रह्मांडरचना झाली आहे. असें कांहीं तत्वचिंतक म्हणतात. विश्वाचा विस्तार कसा झाला याबद्दल कल्पना जितकी वाढवावी तितकी वाढते. निरनिराळे तत्वचिंतक आपआपली कल्पना चालवितत. त्यामुळें तत्वांचा निश्चय करतांना तत्वज्ञानामध्यें निरनिराळी परस्पर विरोधी मतें उत्पन्न होतात. अणि विचारांचा गोंधळ होतो.

English meaning

Then there is the constructed pinda and brahmanda and due to this objectification, imagination increases ("I am so and so, I want this and that, he is good and she is bad" etc.). And because the mind has forgotten its true nature, that nirgun Self has become a jiva whose knowledge is of the gross elements only.

35
मूळ

नाना मतीं नाना भेद । भेदें वाढती वेवाद । परी तो ऐक्यतेचा संवाद । साधु जाणती ॥ ३५ ॥

मराठी अर्थ

निरनिराळ्या विचारांमध्यें अनेक भेद असतात. त्यांमुळे वादविवाद वाढतात. अशा सर्व भेदांमध्यें ऐक्यता शोधून सार्‍या मतांमध्यें संवाद उत्पन्न करणें फक्त साधु पुरुषांनाच माहित असते.

English meaning

Then there are the `many' understandings and the `many' differences and due to these differences, discussions and arguments increased. Only the sadhu knows that `dialogue of Oneness'. (He has used vivek; He has discriminated between the Knower and that which is known)

36
मूळ

तया संवादाचें लक्षण । पंचभूतिक देह जाण । त्या देहामधें कारण । आत्मा वोळखावा ॥ ३६ ॥

मराठी अर्थ

सर्व मतांमधील संवाद म्हणजे देह पंचभूतात्मक असतो. पंचभूतें जड आसतात. त्यांना चेतना देणारा आत्मा होय. तो देहात असतो, पण तो देहाहून निराळा असतो.

English meaning

There is this *dialogue that the sadhu has with that Reality and there is this body made by of the five great elements. Therefore that atma should recognize this causal body within this body (the causal body brings ignorance of that knowledge or supracausal body. And such ignorance is the cause of the subtle and gross bodies. And this ignorance of the causal body ie. forgetting, will also be the end of gross objectification and reveal that knowledge once more. Therefore it should be recognized. This is all the play of knowledge and ignorance;10 ignorance of Reality is knowledge and ignorance of knowledge is body consciousness; one is on account of the other; each are a side of the one coin. Ignorance is obviously not something you can know but its presence can only be inferred by knowing ie. ignorance of one thing reveals another thing.). *(The sadhu has accomplished lifes goal. He has transcended the supracausal body or knowledge, still He uses this knowledge to be in the world but maintains His Oneness. The sadhak on the other hand, is still in the process of understanding. Through study and vivek he has to navigate his way through the various bodies to reach knowledge and then absorb that knowledge in no-knowledge)

37
मूळ

देह अंती नासोन जाये । त्यास आत्मा म्हणों नये । नानां तत्वांचा समुदाय । देहामधें आला ॥ ३७ ॥

मराठी अर्थ

शेवटीं देहाचा नाश होतो. म्हणून देहाला आत्मा मानता येत नाही. देहामध्यें पंचभूतांचा समूह असतो.

English meaning

In the end, this causal body which is not will be destroyed and so it should not be called that atma. In the causal body (which is not), this meeting place of knowledge (ie. supra-causal body) has appeared as the gross elements that bring body consciousness.

38
मूळ

अंतःकर्ण प्राणादिक । विषये इंद्रियें दशक । हा सूक्ष्माचा विवेक । बोलिला शास्त्रीं ॥ ३८ ॥

मराठी अर्थ

अंतःकरण, पंचप्राण, दहा इंद्रियें, व त्यांचे दहा विषय, हे सगळे मिळून माणसाचा सूक्ष्म देह बनतो असें शास्त्र सांगते.

English meaning

This brings the antah-karana, the five pranas, the sense objects and the ten organs (ie. five sense and five action organs). These belong to the subtle body but if there is vivek then, you will understand that within this body there is this `speech' of the shasthras (ie. by neti, neti this `I am' or supracausal body is revealed).

39
मूळ

घेतां सूक्ष्माची शुद्धी । भिन्न अंतःकरण मन बुद्धी । नाना तत्वांचे उपाधी । वेगळा आत्मा ॥ ३९ ॥

मराठी अर्थ

सूक्ष्म देहाचा शोध घेतला तर अंतःकतण, मन व बुद्धि पंचभूतांपासून उत्पन्न झालेल्या उपाधी आहेत असें आढळतें. त्यांहून आत्मा अगदी निराळा आहे.

English meaning

When you make further investigation of that subtle body then you find that the atma is separate to the distinct antah-karana/inner faculty of knowing, the mind, the intellect and the `many' limited concepts of the gross elements.

40
मूळ

स्थूळ सूक्ष्म कारण । माहाकारण विराट हिरण्य । अव्याकृत मूळप्रकृती जाण । ऐसे अष्टदेह ॥ ४० ॥

मराठी अर्थ

स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण हे चार पिंडाचे आणि विराट, हिरण्यगर्भ, अव्याकृत व मूळप्रकृति हे चार ब्रह्मांडाचे मिळून आठ देह होतात.

English meaning

There is the individual gross, the subtle, the causal and the supracausal body. And there is the universal gross/virat, the universal subtle/hiranya, the universal causal/avyakrut and the universal supracausal/mula prakruti body. Know these eight bodies. (If these eight bodies can be know then you cannot be them)

41
मूळ

च्यारी पिंडीं च्यारी ब्रह्मांडीं । ऐसी अष्टदेहाची प्रौढी । प्रकृतिपुरुषांची वाढी । दशदेह बोलिजे ॥ ४१ ॥

मराठी अर्थ

चार देह पिंडाचे व चार देह ब्रह्मांडाचे असे आठ देह व त्यांत प्रकति आणि पुरुष असे दोन मिळवले कीं, एकंदर दहा देह होतात.

English meaning

When there are these four bodies in the pinda and the four in the brahmanda then, there is the bold empty swelling and bragging of each of these eight bodies (ie. then there are the egos of each). All this is the expansion of prakruti/purush into this gross body with the ten senses. (All these bodies and their qualities are due to knowledge and ignorance and this leads to objectification. Therefore through vivek seek out the One who occupies and knows these bodies and their qualities and thus find Yourself)

42
मूळ

ऐसें तत्वांचें लक्षण । आत्मा साक्षी विलक्षण । कार्य कर्ता कारण । दृश्य तयाचें ॥ ४२ ॥

मराठी अर्थ

पिंडब्रह्मांडांच्या तत्वांचे विवरण हें अशा प्रकारचें आहे. आत्मा सर्वांहून वेगळा असून तो सर्वांचा साक्षी आहे. कार्य, कर्ता व कारण या सगळ्यांना तो वेगळेपणानें पाहतो.

English meaning

Then one's attention gets fixed upon the gross elemental world. But that atma is the witness and different to this. However to that Reality there has come the concepts of a cause and effect, a doer, and this visible `all'.

43
मूळ

जीवशिव पिंडब्रह्मांड । मायेअविद्येचें बंड । हें सांगतां असे उदंड । परी आत्मा तो वेगळा ॥ ४३ ॥

मराठी अर्थ

जीव आणि शिव, पिंड आणि ब्रह्मांड, माया आणि अविद्या यांचा विस्तार अतिशय गुंतागुंतीचा व मोठ्या प्रमाणांत आहे. तो सगळा सांगणें कठिण आहे. पण या सगळ्याहून आत्मा मात्र अगदी निराळा, अलिप्त आहे.

English meaning

Then there is the jiva and shiva, the pinda and brahmanda and the insurrection of avidya maya. That thoughtless paramatma has nothing to do with all these but that witness atma is not like that. (Now there is an investigation into the nature of that atma. That thoughtless paramatma has no connection with maya but the witnessing atma appears to have a relationship to this maya. That Self-illuminated atma gives light and existence to her)

44
मूळ

पाहों जातां आत्मे च्यारी । त्यांचें लक्षण अवधारीं । हें जाणोनि अभ्यांतरीं । सदृढ धरावें ॥ ४४ ॥

मराठी अर्थ

नुसत्या आत्म्याचा विचार केला तर चार आत्में आहेत. त्यांची लक्षणें आतां सांगतो. ती लक्षपूर्वक ऐकावीत. आणि मनामध्यें घट्ट धरुन ठेवावीत.

English meaning

If one tries to understand then, there are four atmas and therefore one has to understand the nature of each. And when that thoughtless swarup is known within then, that should be firmly held.

45
मूळ

एक जीवात्मा दुसरा शिवात्मा । तिसरा परमात्मा जो विश्र्वात्मा । चौथा जाणिजे निर्मळात्मा । ऐसे च्यारी आत्मे ॥ ४५ ॥

मराठी अर्थ

पहिला जीवात्मा, दुसरा शिवात्मा, तिसरा परमात्मा यालाच विश्वात्मा म्हणतात व चौथा निर्मलात्मा होय. असे चार आत्में आहेत.

English meaning

First there is jivatma and then the shivatma and the third is paramatma. When that shivatma or witness purush becomes the paramatma then it also gets called as the universal atma. And the fourth should be known as the nirmal-atma (pure atma). Such are the four atma.

46
मूळ

भेद उंच नीच भासती । परी च्यारी येकचि असती । येविषीं दृष्टांतसंमती । सावध ऐका ॥ ४६ ॥

मराठी अर्थ

या चार आत्म्यांच्यामध्यें उंच, नीच, किंवा श्रेष्ठ कनिष्ठ भेद आहेत असा भास होतो पण तें खरें नाही. कारण मुळांत चारी आत्में एकच आहेत. एक दृष्टांत देऊन हा मुद्दा स्पष्ट समजावून देतो. तें नीट ऐका.

English meaning

Though there appears to be divisions in that highest and constant Self still, these four are One only. Listen attentively to this simile of space.

47
मूळ

घटाकाश मठाकाश । महदाकाश चिदाकाश । अवघे मिळोन आकाश । येकचि असे ॥ ४७ ॥

मराठी अर्थ

आकाश चार प्रकारचे आहे. घटाकाश, मठाकाश, महदाकाश व चिदाकाश दिसावयास हे चार दिसले तरी मूळ आकाश अखेर एकच आहे.

English meaning

There is the space/akash in the pot, the space in the temple, the space beyond the temple and the space that is the chid (knowledge). These appear different due to the mind yet there is the one space only.

48
मूळ

तैसा जीवात्मा आणी शिवात्मा । परमात्मा आणी निर्मळात्मा । अवघा मिळोन आत्मा । येकचि असे ॥ ४८ ॥

मराठी अर्थ

त्याचप्रमाणें जीवात्मा, शिवात्मा, परमात्मा आणि निर्मळात्मा हे दिसायला चार दिसले तरी अखेर सारे मिळून एकच आत्मा आहे.

English meaning

Like this is the jivatma, the shivatma, the paramatma and the nirmalatma. The mind creates these differences yet the atma is One only.

49
मूळ

घटीं व्यापक जें आकाश । तया नाव घटाकाश । पिंडी व्यापक ब्रह्मांश । त्यास जीवात्मा बोलिजे ॥ ४९ ॥

मराठी अर्थ

घटाला व्यापून असणारें जें आकाश तें घटाकाश होय. त्याचप्रमाणें पिंडास व्यापून असणारें जें परब्रह्म त्याला जीवात्मा म्हणतात.

English meaning

The space that pervades the pot gets called pot-space. In the same way, that part of brahman that pervades the pinda should be called the jivatma. (Then that brahman appears bound by taking itself to be an individual body).

50
मूळ

मठीं व्यापक जें आकाश । तया नाव मठाकाश । तैसा ब्रह्मांडीं जो ब्रह्मांश । त्यास शिवात्मा बोलिजे ॥ ५० ॥

मराठी अर्थ

मठाला व्यापून असणारें जें आकाश तें मठाकाश होय. त्याचप्रमाणें विश्वाला व्यापून असणारें जें परब्रह्म त्यास शिवात्मा म्हणतात.

English meaning

The space that pervades the temple gets called the temple-space/akash. In the same way, that part of brahman in the brahmanda should be called the shivatma (then there is the witness purush).

51
मूळ

मठाबाहेरील आकाश । तया नांव महदाकाश । ब्रह्मांडाबाहेरील ब्रह्मांड । त्यास परमात्मा बोलिजे ॥ ५१ ॥

मराठी अर्थ

मठाबाहेर असणारें जें आकाश तें महदाकाश होय. त्याचप्रमाणें विष्वाच्या बाहेरचे जें परब्रह्म त्यास परमात्मा म्हणतात.

English meaning

When the space is outside of the temple, then that Reality gets called the great- space. In the same way, when that part of brahman is outside the brahmanda, then it should be called the paramatma (or universal atma).

52
मूळ

उपाधीवेगळें आकाश । तया नांव चिदाकाश । तैसा निर्मळात्मा परेश । तो उपाधीवेगळा ॥ ५२ ॥

मराठी अर्थ

कोणतीही उपाधी म्हणजे मर्यादा नसणारें जें आकाश तें चिदाकाश होय. त्याचप्रमाणें कोणत्याही उपाधीपासून निराळे असणार्‍या परब्रह्माला निर्मळात्मा किंवा परमेश्र्वर म्हणतात.

English meaning

When the space is without a limiting concept, then that Reality gets called knowledge-space/akash. In the same way, there is that *Supreme Lord/paresh, the pure- atma, void of any limiting concept. *(guru ha paramatma pareshu...)

53
मूळ

उपाधीयोगें वाटे भिन्न । परी तें आकाश अभिन्न । तैसा आत्मा स्वानंदघन । येकचि असे ॥ ५३ ॥

मराठी अर्थ

घट किंवा मठ यांसारख्या उपाधींमुळें आकाश भेदयुक्त भासलें तरी तें मूळ अभेदच असते. त्याचप्रमाणें स्वानंदानें आंत बाहेर भरलेला आत्मा पिंड व ब्रह्मांड यांच्या उपाधीनें लहान मोठा भासतो, पण तो मूळ एकच एक आहे. त्याच्यामधें भेदास मागमूस नाही.

English meaning

Due to its union with the limiting concepts (ie. pinda, brahmanda and outside brahmanda) divisions are felt in the space, but that space is without divisions. In the same way, that atma is full of its own bliss and One only.

54
मूळ

दृश्या सबाह्य अंतरीं । सूक्षात्मा निरंतरीं । त्याची वर्णावया थोरी । शेष समर्थ नव्हे ॥ ५४ ॥

मराठी अर्थ

आत्मा अत्यंत सूक्ष्म आहे. तो सर्व व्यापून शिल्लक राहतो. म्हणून या दृश्य विश्वातील प्रत्येक वस्तूला आत्मा आंत बाहेर निरंतर व्यापून आहे. त्याचा महिमा वर्णन करण्याचे सामर्थ्य प्रत्यक्ष शेषाच्या अंगीं देखील नाही.

English meaning

Inside and outside of this visible `all' there this is that subtle atma (or paramatma) within parabrahman (or pure atma). Even *shesh cannot describe the greatness of That (shesh is the witness purush; he knows this `all'. paramatma does know this `all'; He is and only He is).

55
मूळ

ऐसें आत्म्याचें लक्षण । जाणतां नाहीं जीवपण । उपाधी शोधितां अभिन्न । मुळींच आहे ॥ ५५ ॥

मराठी अर्थ

आत्मा कसा सूक्ष्म आणि सर्वांना व्यापून आहे, हे ज्याच्या अनुभवास आलें त्याचें जीवपण शिल्लक उरत नाही. त्याचा जीचभाव नाहींसा होतो. उपाधी बाजूस सारली कीं, आत्मा मूळांत भेदरहित आहे. हें साक्षात् ज्ञान होते.

English meaning

The attentions of the atma are like this. When there is knowing, that one is no longer a jiva. And by searching through these limiting concepts, one discovers that at the root, there is no division (One pure atma).

56
मूळ

जीवपण येकादेसी । अहंकारें जन्म सोसी । विवेक पाहातां प्राणीयांसी । जन्म कैचा ॥ ५६ ॥

मराठी अर्थ

माणूस जीवपणानें एकदेशी बनतो, संकुचित होतो. मी देह आहे या अहंकारानें त्याला जन्म सोसावें लागतात. पण आत्मानात्म विवेक केला तर मी देह नसून आत्माच आहे अशी त्याची खात्री होते. मग त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही.

English meaning

Due to the limitation of being a jiva ("I am a body") there is the ego/ahamkar and the sufferings of birth. But if one understands vivek then, how can there be birth in the prana?

57
मूळ

जन्ममृत्यापासून सुटला । या नाव जाणिजे मोक्ष जाला । तत्वें शोधितां पावला । तत्वता वस्तु ॥ ५७ ॥

मराठी अर्थ

जन्म व मृत्यु यांच्या कचाट्यांतून जो सुटला त्यास मोक्ष मिळाला असें समजावें. तत्वांचा शोध घेतां घेतां माणूस सद्वस्तु म्हणजे ब्रह्म अनुभवतो.

English meaning

When there is freedom from birth and death then, this should be known as Libe- ration. When the gross elements are searched and purified in this way, then truly that Self is attained.

58
मूळ

तेचि वस्तु ते आपण । हें महावाक्याचें लक्षण । साधु करिती निरुपण । आपुलेन मुखें ॥ ५८ ॥

मराठी अर्थ

आपण स्वतः प्रत्यक्ष परब्रह्मच आहोंत असा महावाक्याचा खरा अर्थ आहे. साधु पुरुष हा अर्थ आपल्या मुखानें हा अर्थ समजावून देतात.

English meaning

That Self is itself this attention of `I am' and the sadhu makes His discourse through this `I am' (The sadhu knows no separation between Himself and His creation; yet He uses His creation/knowledge to function).

59
मूळ

जेचि क्षणी अनुग्रह केला । तेचि क्षणीं मोक्ष जाला । बंधन कांहीं आत्मयाला । बोलोंचि नये ॥ ५९ ॥

मराठी अर्थ

ज्या क्षणीं साधूची कृपा होते त्याच क्षणीं आपण साक्षात् ब्रह्म आहोत असा साधकास अनुभव येतो. त्याच क्षणीं तो मुक्त होतो. आत्मस्वरुपाला कांहीं बंधन आहे हें बोलणेंच खरें नाही.

English meaning

When mula maya receives His grace then, at that very moment, Liberation is attained and the binding of this `I am' no longer remains for that atma (ie. Final Liberation).

60
मूळ

आतां आशंका फिटली । संदेहवृत्ती मावळली । संतसंगें तत्काळ जाली । मोक्षपदवी ॥ ६० ॥

मराठी अर्थ

हें सारें विवेचन ऐकून श्रोत्यांची शंका निरसन पावली. त्यांच्या मनांतील संदेहवृत्ती मावळली. संत संगतीनें मोक्षपदवी कशी तत्काळ मिळते हें समजले.

English meaning

Now when this doubt `I am' is removed and this knowing vritti is dissolved then, due to the company of the Truth, the title of Liberated is received at that time.

61
मूळ

स्वप्नामधें जो बांधला । तो जागृतीनें मोकळा केला । ज्ञानविविकें प्राणीयाला । मोक्षप्राप्ती ॥ ६१ ॥

मराठी अर्थ

एका माणसाला स्वप्न पडलें कीं, आपण बंधनांत आहोत. त्याला जागें केलें कीं, त्याचे बंधन नाहींसे होऊन तो मोकळा होतो. त्याचप्रमाणें ज्ञानपूर्वक विवेकानें माणसाची देहबुद्धि नाहींशी होते व त्याला मोक्ष प्राप्त होतो.

English meaning

That purush who had been enwrapped in this dream was set free upon awaking. Thus due to this knowledge and vivek, the one in the prana gained Liberation.

62
मूळ

अज्ञाननीसीचा अंतीं । संकल्पदुःखें नासती । तेणें गुणें होये प्राप्ती । तत्काळ मोक्षाची ॥ ६२ ॥

मराठी अर्थ

अज्ञानरुपी रात्र संपली कीं माणसाचीं संकल्पदुःखें नाहींशी होतात. संकल्प नाहींसे झाले कीं त्या योगानें त्यास ताबडतोप मोक्षप्राप्ती होते.

English meaning

The night of ignorance has come to an end and the sufferings of this `I am' have been destroyed. At that time, on account of that pure sattwa guna, Liberation was gained

63
मूळ

तोडावया स्वप्नबंधन । नलगे आणीक साधन । तयास प्रेत्न जागृतीवीण । बोलोंचि नये ॥ ६३ ॥

मराठी अर्थ

स्वप्नामधील बंधन तोडून टाकण्यास दुसरें कोणतें साधन लागत नाहीं. फक्त त्यास जागें करावें, म्हणून साधकानें जागें होण्याचा प्रयत्न करावा. दुसर्‍या साधनाचा विचारच करुं नये.

English meaning

To cut the bindings of the dream no more sadhana is necessary other than awake- ning; even the effort of this `speech' is not required.

64
मूळ

तैसा संकल्पें बांधला जीव । त्यास आणीक नाहीं उपाव । विवेक पाहातां वाव । बंधन होये ॥ ६४ ॥

मराठी अर्थ

जीव केवळ संकल्पानें बांधलेला आहे. संकल्पाच्या बंधनांतून सुटण्यास दुसरा उपाय नाही. आत्मानात्म विवेक केला तर हे संकल्पाचे बंधन आपोआप नाहींसें होते.

English meaning

Just as due to this `I am' sankalpa there is the bondage of the jiva, so too this `I am' is also the only remedy required for the Liberation of that atma. For when one understands vivek, then bondage is powerless.

65
मूळ

विवेक पाहिल्याविण । जो जो उपाव तो तो सीण । विवेक पाहातां आपण । आत्माच असे ॥ ६५ ॥

मराठी अर्थ

विवेकावाचून इतर सगळे उपाय केले तर फुकट श्रम मात्र घडतात. विवेक हाच खरा एक उपाय आहे. विवेक केला तर आपण स्वतः आत्मस्वरुप आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो.

English meaning

But if vivek does not understood that purush and this `I am' then, that atma gets weary (then you wake by and become a body and go to sleep when you are tired of all the worldly living). But when you understand vivek then, you are that atma only.

66
मूळ

आत्मयाचा ठांई कांहीं । बद्ध मोक्ष दोनी नाहीं । जन्ममृत्यु हें सर्वहि । आत्मत्वीं न घडे ॥ ६६ ॥

मराठी अर्थ

आत्मस्वरुपाच्या ठिकाणीं बंध नाहीं आणि मोक्ष पण नाहीं जन्म आणि मृत्यु हे देहाला असतात. आत्म्याला जन्म नाहीं तसा मृत्युसुद्धां नाही.

English meaning

Then this `I am' is that place of the atma and neither bondage nor liberation remain. But if that thoughtless Self has birth and death or even this `I am' body then, that atma has not been accomplished. (Note: By the process of vivek the atma is investigated and all that we are not gets negated and left from the mind. That atma is within the jiva and all its divisions but taking its self to be the jiva, it is as if not there. That same atma is within this `all', as the witness but has superimposed its own trueness upon its reflection; this `all'. Then that same atma realises this `all' is also not the Truth and stops caring for it and realises He is the only Truth. And finally His Oneness disappears and there is an end of that endless Self) .